Multibagger Stocks List 2022 | रॉकेट बनले ‘हे’ 4 पेनी स्टॉक, 52 दिवसातच गुंतवणुकदारांना 1,000% पेक्षा जास्त रिटर्न; 1 लाखाचे झाले 11 लाख रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stocks List 2022 | तुम्ही या वर्षीच्या मल्टीबॅगर स्टॉकची यादी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला 2022 सालातील 4 मल्टीबॅगर पेनी स्टॉक्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आतापर्यंत 52 ट्रेडिंग सत्रांमध्ये 1000 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. (Multibagger Stocks List 2022)

 

1. SEL Manufacturing :
एसईएल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स 44.40 रुपये (BSE वर 3 जानेवारी 2022) वरून 529.55 रुपयांपर्यंत वाढले आहेत. एसईएल मॅन्युफॅक्चरिंगचे शेअर्स या स्टॉकने 2022 मध्ये आतापर्यंत 1,092.68% जबरदस्त रिटर्न दिला आहे.

म्हणजेच, या शेअरने 2022 च्या आतापर्यंतच्या 52 ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांना हजाराहून जास्त फायदा मिळवून दिला आहे. जर एखाद्या गुंतवणुकदाराने यावर्षी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम 11.92 लाख रुपये झाली असती.

 

2. Sezal Glass :
सेझल ग्लासचे शेअर रु. 25.50 (बीएसईवर 3 जानेवारी 2022 रोजी) वरून रु. 287.40 वर पोहोचले आहेत. या काळात, या स्टॉकने 2022 मध्ये आतापर्यंत 1,027.06% जबरदस्त रिटर्न दिला आहे. या वर्षी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आज ते 11.27 लाख रुपये झाले असते.

3. Kaiser Corporation Limited :
कैसर कॉर्पोरेशनचे शेअर्स रु. 2.92 (बीएसई 3 जानेवारी 2022 रोजी) वरून 33.70 पर्यंत वाढले आहेत. या पॅकेजिंग मल्टीबॅगर स्टॉकने 2022 मध्ये आतापर्यंत 1,054.11% जबरदस्त रिटर्न दिला आहे. या वर्षी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आज ही रक्कम 11.54 लाख रुपये झाली असती. (Multibagger Stocks List 2022)

 

4. Shanti Educational :
शांती एज्युकेशनलचे शेअर्स रु. 99.95 (एनएसईवर 3 जानेवारी 2022) वरून रु. 867.80 वर पोहोचले आहेत. या शेअरने 2022 मध्ये आतापर्यंत 768.23% मजबूत रिटर्न दिला आहे. यावर्षी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आज ही रक्कम 8.68 लाख रुपये झाली असती.

 

Web Title :- Multibagger Stocks List 2022 | 4 multibagger penny stocks for 2022 delivered 1k percent return in 52 days do you have

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा