Multibagger Stocks | Brightcom ग्रुपच्या शेयरने 3 वर्षात दिला 7,000% चा रिटर्न, आता बोनस शेयरवर करताहेत विचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stocks | शेअर बाजारात पैसे गुंतवणार्‍या प्रत्येक गुंतवणुकदाराचे स्वप्न असते की त्याच्या गुंतवणुकीवर कंपनीने भरपूर रिटर्न द्यावा. ब्राईटकॉम ग्रुप (Brightcom Group) ही अशीच एक कंपनी आहे जिने आपल्या गुंतवणूकदारांचे हे स्वप्न पूर्ण केले आहे. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरची किंमत 2,700 टक्क्यांहून अधिक वाढली आहे, तर गेल्या तीन वर्षांत ती 7,000 हून अधिक वाढली आहे. (Multibagger Stocks)

 

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये Brightcom Group चे शेअर्स 5 रुपये भावाने व्यवहार करत होते. गेल्या वर्षभरात त्याची किंमत प्रचंड वेगाने वाढली होती, आता ती 190 रुपयांच्या पातळीवर आली आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर, जर तुम्ही एक वर्षापूर्वी ब्राईटकॉम ग्रुपच्या शेअर्समध्ये 50,000 रुपये गुंतवले असते तर आज तुमच्या पैशाचे मूल्य 19 लाख रुपये झाले असते.

 

काय करते कंपनी?
ब्राईटकॉम ग्रुप ही डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे. ती जगातील अनेक देशांमध्ये Ad-tech, न्यू मीडिया आणि IoT आधारित व्यवसायात आहे. कंपनी अमेरिका, इस्रायल, लॅटिन अमेरिका ME, वेस्टन युरोप आणि आशिया Pacific प्रदेशात व्यवसाय करते.

 

कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत Airtel, British Airways, Coca-Cola, Hyundai Motors, ICICI Bank, ITC, LIC, MTV, P&G Qatar Airways, Samsung, Viacom, Sony, Star India, Vodafone, Titan, मारुती सुझुकी सारख्या मोठ्या जाहिरातदारांचा समावेश आहे.

कंपनी करू शकते बोनस शेअर्सची घोषणा
Brightcom ग्रुपने स्टॉक एक्सचेंजला पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, कंपनीची बोर्ड मीटिंग 25 जानेवारीला होणार आहे.
या कालावधीत बोनस शेयर जारी करण्याच्या प्रस्तावावर विचार केला जाईल. (Multibagger Stocks)

 

कंपनीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 12 महिन्यांत ब्राईटकॉम समूहाचे शेअर्स अनेक पटींनी वाढले आहेत.
ते आता अशा टप्प्यावर पोहोचले आहे जिथे ते अनेक लहान-गुंतवणूकदारांच्या आवाक्याबाहेर जाऊ शकतात.

 

अशा परिस्थितीत, बोनस शेअर्स जारी केल्याने, लहान गुंतवणूकदारांसाठी हा शेअर स्वस्त होईल.
त्याद्वारे आमच्या शेयर धारकांच्या यादीत नवीन सदस्य सहभागी होतील.

 

NSE वर, Brightcom समूहाचा शेअर मंगळवारी 5.00 टक्क्यांनी घसरून 181.50 रुपयांवर बंद झाला.

 

 

Web Title :- Multibagger Stocks | multibagger brightcom group shares price soars 7000 percent in 3 years

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC Saral Pension Scheme | एलआईसीच्या ‘या’ पॉलिसीमध्ये दर महिना मिळेल 12,000 रुपयांची पेन्शन, भरावा लागेल एकदाच प्रीमियम

 

Pune Crime | कुख्यात निलेश घायवळ टोळीमधील 6 गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

 

Pune Crime | पुणे पोलिसांच्या सामुहिक प्रयत्नामुळं बाणेरमधून ‘गायब’ झालेला 4 वर्षाचा स्वर्णव उर्फ डुग्गू ‘मम्मी-पप्पा’ कुशीत ‘सुखरूप’, ‘त्या’ बाबींचा तपास सुरू