Multibagger Stocks | 60 पैशाच्या स्टॉकनं दिले छप्परफाड रिटर्न ! वर्षभरात 3533 टक्के परतावा; 1 लाखाचे झाले 36 लाख, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Multibagger Stocks | व्यवसाय म्हणून अनेकजण गुंतवणूकीत सामील होत असतात. अनेक छोट्या मोठ्या गुंतवणूकीत गुंतवणूकदार (Investors) भाग घेऊन चांगला परतावा मिळावा यासाठी प्रयत्न करत असतात. दरम्यान मागील काही काळापासून मल्टीबॅगर स्टॉक्स (Multibagger Stocks) गुंतवणूकदारांना अनेक चांगला परतावा देत आहे. अशा स्टॉक्समध्ये योग्य वेळी गुंतवणूक करून व्यावसायिक मोठा फायदा घेत आहेत. ज्याने गुंतवणूकदारांना फार कमी वेळात कोट्यधीश केलं आहे. त्या स्टॉक्स कंपनीबाबत जाणून घ्या.

 

एमआयसी (MIC) असं या कंपनीचं नाव आहे. इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (MIC Electronics Limited). एमआयसी LED व्हिडीओ डिस्प्ले, हाय-एंड इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकॉम उपकरणे आणि दूरसंचार सॉफ्टवेअरचे डिझाइन, विकास आणि निर्मितीमध्ये कार्यरत आहे. तर मागील वर्षी मार्च महिन्यात एमआयसी इलेक्ट्रॉनिक्सच्या एका शेअरची किंमत केवळ 60 पैसे होती आणि सध्या कंपनीच्या एका शेअरची किंमत 21.80 रुपये आहे. समजा जर तुम्ही कंपनीचे शेअर्स मार्चमध्ये या किंमतीला 1 लाख रुपयांना विकत घेतले असते, तर तुम्हाला 1.67 लाख शेअर्स मिळाले असते. (Multibagger Stocks)

आजच्या हिशोबाने तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास 36 लाख रुपये झाले असते.
तर, कंपनीच्या शेअर्सने 11 महिन्यांत गुंतवणूकदारांना 3533 टक्के परतावा दिला आणि त्यांना कोट्यधीश बनवले आहे.
2013 साली MIC इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने नाशिक महापालिकेसोबत (Nashik Municipal Corporation) करार केला.
2014 साली, MIC इलेक्ट्रॉनिक्सने LED आधारित 3D-होलोग्राम लाँच केले. 2015 मध्ये, MIC ला इलेक्ट्रॉनिक्स बॅग LED लाईटच्या पुरवठ्यासाठी ऑर्डर मिळाली.”

 

दरम्यान, 2016 साली MIC Electronics Limited आणि LG Innotech यांनी LG Innotek च्या माध्यमातून बनवण्यात येणाऱ्या कॉम्पोनन्टचा वापर करत एनर्जी एफिशिअंट एलईडी लायटिंग (Energy Efficient LED lighting) उत्पादनांचं संयुक्तरित्या विकसित करण्याचा करार केला.
तसेच, कंपनीला रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (रेल्वे मंत्रालय) कडून डिस्प्ले नेटवर्क ऑर्डर (Display Network Order) मिळालीय.

 

Web Title :- Multibagger Stocks | multibagger stock share market investment 60 paise penny stock gave huge return one lakh becomes 36 lakhs in just 11 months

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा