Multibagger Stocks | कुबेराचा खजिना ठरले ‘हे’ 2 मल्टीबॅगर स्टॉक, लाँग टर्म गुंतवणुकदारांवर पैशाचा पाऊस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Multibagger Stocks | शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, ज्यांनी दीर्घ मुदतीत गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला आहे. श्री सिमेंट (Shree Cement) आणि सेरा सॅनिटरीवेअर (Cera sanitaryware) चे शेअर्स देखील दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी कुबेराचा खजिना ठरले आहेत. श्री सिमेंटचे शेअर दीर्घकाळ ठेवणार्‍या गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. अवघ्या 21 वर्षात या मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे 770 पटीने वाढवले. त्याचप्रमाणे सेरा सॅनिटरीवेअरच्या स्टॉकने 15 वर्षात 1 लाख गुंतवणार्‍या गुंतवणूकदाराला करोडपती बनवले आहे. (Multibagger Stocks)

 

मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, 6 जुलै 2001 रोजी जेव्हा NSE वर श्री सिमेंटच्या शेअर्सचा व्यवहार सुरू झाला, तेव्हा त्याची किंमत फक्त 30.30 पैसे होती. त्याचवेळी, बुधवार, 7 सप्टेंबर रोजी हा शेअर 8.43 टक्क्यांच्या उसळीसह 23,480 रुपयांवर बंद झाला. अशाप्रकारे, श्री सिमेंटच्या शेअर्समध्ये जुलै 2001 पासून सुमारे 77,391.75 टक्के वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात श्री सिमेंटच्या शेअर्समध्ये 10.78% वाढ झाली. मात्र, गेल्या वर्षभरात शेअरवर दबाव आल्याने 23.75 टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या 5 वर्षात त्याने गुंतवणूकदारांना 25.30 टक्के रिटर्न दिला आहे. (Multibagger Stocks)

 

13 हजार गुंतवणारा झाला करोडपती
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 जुलै 2001 रोजी श्री सिमेंटच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपयांचे मूल्य सुमारे 7.75 कोटी रुपये झाले असते. एवढेच नाही तर 2001 मध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 13,000 रुपये गुंतवले असते तर तो आज करोडपती झाला असता आणि त्याच्या गुंतवणुकीचे रूपांतर 1 कोटी 73 रुपये झाले असते.

15 वर्षात केले मालामाल
मिडकॅप स्टॉक Cera sanitaryware चा शेअर बुधवारी 4.19% वाढीसह 5560 रुपयांवर बंद झाला.
गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 17.81% वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2007 मध्ये सेरा सॅनिटरीवेअरचा शेअर 70.75 रुपयांवर व्यवहार करत होता.
त्याच वेळी, त्यांची किंमत आता 5560 रुपयांवर पोहोचली आहे. जर 2007 मध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते,
तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य 1.57 कोटी रुपये झाले असते.
एवढेच नाही तर या 15 वर्षांत कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सचे वाटपही केले, त्यामुळे त्यांची गुंतवणूक दुप्पट झाली.

 

Web Title :- Multibagger Stocks | multibagger stocks shree cement share price cera sanitaryware share price hot stocks multibagger return

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Cardiac Arrest | माता पार्वती बनून नाचणार्‍या व्यक्तीला आला हार्ट अटॅक… स्टेजवरच मृत्यू, Video

 

Nashik ACB Trap | 3000 हजार रुपये लाच घेताना पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

NEET Exam Result | नीट परीक्षेत दुसऱ्यांदा कमी मार्क मिळाले, रोहिणीने जीवनयात्रा संपवली