Multibagger Stocks | ‘या’ स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना बनवले करोडपती, 11 वर्षात एक लाखाचे झाले 1 कोटी

0
48
Multibagger Stocks | multibagger stocks turn 1 lakh rs to more than 1 crore rs in 11 years money making tips
File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Multibagger Stocks | शेयर बाजार गुंतवणुकदारांसाठी धैर्य (Patience) महत्वाचे असते. कारण शेयर बाजारात पैसा स्टॉक्सच्या खरेदी आणि विक्रीत नाही तर एक स्टॉक शक्य तेवढ्या कालावधीसाठी ठेवण्यात आहे. (Multibagger Stocks)

 

स्टॉक खरेदी करण्याचा अर्थ एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करणे आणि यासाठी एखाद्याने तोपर्यंत स्टॉक ठेवले पाहिजेत जोपर्यंत त्याच्या नफ्याची शक्यता कायम असते.
अशा मल्टीबॅगर शेयरची एक मोठी यादी आहे, ज्यांनी मोठ्या कालावधीत गुंतवणुकदारांचे लाखो रुपये कोट्यवधीमध्ये बदलले आहेत.

 

आज भले ही स्टॉक मार्केट कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या भितीने कोसळत असला तरी मोठ्या कालावधीच्या गुंतवणुकीत त्याने नेहमी नफा दिला आहे.
आणि त्यास केवळ नफा म्हणू शकत नाही, तर गुंतवणुकदारांची जबरदसत कमाई करून दिली आहे.
अनेक मल्टीबॅगर स्टॉक असे आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना एक दशकात 100 पट नफा दिला आहे. येथे एक लाख रुपयांचे थेट एक कोटी रुपये झाले आहेत. (Multibagger Stocks)

 

येथे आम्ही काही अशाच मल्टीबॅगर शेयरची चर्चा करत आहोत, जे 11 वर्षात 1 लाखावरून 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे झाले –

 

1. बजाज फायनान्स (Bajaj Finance stock Price)

 

बजाज फायनान्सचा स्टॉक (Bajaj Finance share price) नोव्हेंबर, 2011 मध्ये 64-65 रुपयांचा होता.
तर एप्रिल, 2010 मध्ये तो 40 रुपयांच्या जवळपास ट्रेड करत होता.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) आज या स्टॉकची किंमत 6,780 रुपये आहे.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 11 वर्षापूर्वी या 40 रुपयांच्या स्तरावर शेयर खरेदी करून 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे एक लाख वाढून जवळपास 1.69 कोटी रुपये झाले असते.

 

2. अवंती फिड्स स्टॉक (Avanti Feeds Share Price)

 

अवंती फिड्स स्टॉक यावर्षी नॉन परफॉर्मर बनला आहे. कारण त्याने वर्षावर्षाला अवघा 4.20 टक्के रिटर्न दिला आहे.
मोठ्या कालावधीत तो पेनी स्टॉकवरून एक क्वालिटी स्टॉक बनला.
मागील 11 वर्षात अवंती फिड्स शेयर 1.60 रुपये (Avanti Feeds stock Price) वरून चढून 542.15 रुपयांवर आला आहे.
जर कुणी 11 वर्षापूर्वी यामध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आज ते वाढून सुमारे 3.38 कोटी रुपये झाले असते.

 

3. अ‍ॅस्ट्रल लिमिटेड स्टॉक (Astral Limited Stock Price)

 

यावर्षी अ‍ॅस्ट्रल लिमिटेडच्या मल्टीबॅगर शेयरने आपल्या शेयरधारकांना शानदार रिटर्न दिला आहे.
सध्या हा शेयर 2,148.45 रुपयांवर (Astral Limited Share Price Today) ट्रेड करत आहे.

 

जर याचा मागील एक दशकाचा इतिहास पाहिला, तर एप्रिल 2010 मध्ये तो जवळपास 12 प्रति शेयर स्तरावर होता.
या 11 वर्षाच्या कालावधीत अ‍ॅस्ट्रल लिमिटेडचा स्टॉक जवळपास 179 पट वाढला.
यासाठी, जर एखाद्या गुंतवणुकदाराने 11 वर्षापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे 1 लाख रुपये आज 1.79 कोटी रुपये झाले असते.

 

Web Title : Multibagger Stocks | multibagger stocks turn 1 lakh rs to more than 1 crore rs in 11 years money making tips

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ashok Chavan | अशोक चव्हाणांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला, म्हणाले – ‘… हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा’

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 97 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

Best Retirement Plans | ‘लाईफ इन्श्युरन्स’ पासून बचतीसह सुरक्षासुद्धा, तयार करा निवृत्तीचा प्लान; जाणून घ्या