Multibagger Stocks | 7.13 रुपयांचा स्टॉक झाला 718 रुपयांचा, 1 लाखाचे झाले 10 कोटी, तुमच्याकडे आहे का?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Multibagger Stocks | आज आम्ही तुम्हाला एका अशा जबरदस्त शेयरबाबत सांगणार आहोत, ज्याने 1 लाख रुपयांचे 1 कोटी केले आहेत. अशा मल्टीबॅगर स्टॉक्सने आपल्या गुंतवणूकदारांना 10 वर्षात मालामाल केले आहे. हा शेयर आहे Vaibhav Global. ज्या गुंतवणुकदारांनी या शेयरमध्ये (Multibagger Stocks) धैर्य राखले त्यांना बंपर रिटर्न मिळाला आहे. ही जेम्स अँड ज्वेलरी कंपनी आहे.

7.13 रुपयांच्या स्टॉकची किंमती झाली 718 रुपये

10 वर्षांपूर्वी 16 सप्टेंबर 2011 ला NSE वर वैभव ग्लोबलच्या शेयरची किंमत 7.13 रुपये होती जी 17 सप्टेंबर 2021 ला 718 रुपयांवर पोहचली.
म्हणजे या 10 वर्षात वैभव ग्लोबलच्या शेयरचा रिटर्न 100 पट राहिला आहे.

मागील 6 महिन्यात विक्रीचा दबाव

मागील 6 महिन्यात वैभव ग्लोबलच्या शेयरवर विक्रीचा जास्त दबाव होता.
मार्च 2021 पासून मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वैभव ग्लोबलच्या शेयरमध्ये तेजी कामय होती.
या दरम्यान कंपनीचा शेयर 996.70 रुपयांपर्यंत पोहचला होता.
मात्र, यानंतर जोरदार प्रॉफिट बुकिंग झाले आणि तो खाली आला.

 

या शेयरने दिला 40 टक्के रिटर्न

या विक्रीनंतर सुद्धा यावर्षी आतापर्यंत वैभव ग्लोबलचा शेयर 510.42 रुपयांवरून वाढून 718 रुपयांपर्यंत पोहचला. या हिशोबाने कंपनीच्या शेयरने 40 टक्केचा रिटर्न दिला.

जर मागील एक वर्षाचा ट्रेड पाहिला तर वैभव ग्लोबलचा शेयर 375.77 रुपयांवरून वाढून 718 रुपयावर पोहचला आहे. या हिशोबाने या शेयरने 91 टक्केचा रिटर्न दिला आहे.

अशाप्रकारे मागील 5 वर्षात वैभव ग्लोबलचा शेयर 62.29 रुपयांवरून वाढून 718 रुपयांवर पोहचला.
जर एखाद्या गुंतवणुकदाराने 5 वर्षापूर्वी या शेयरमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 1 लाख रुपये 11.50 लाख रूपये झाले असते.

10 वर्षात 1 लाख झाले 1 कोटी

जर मागील 10 वर्षाचा रेकॉर्ड पाहिला तर वैभव ग्लोबलचा शेयर 7.13 रुपयांवरून वाढून 17 सप्टेंबर 2021 ला 718 रुपयांपर्यंत पोहचला.

अशाप्रकारे, जर एखाद्या गुंतवणुकदाराने 10 वर्षापूर्वी वैभव ग्लोबल शेयरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे 1 लाख आज 1 कोटी रूपये झाले असते.
कारण या कालावधीत स्टॉक 100 पटपेक्षा जास्त वाढला होता.

 

Web Title : Multibagger Stocks | multibagger stocks vaibhav global give 100 percent return 1 lakh to 1 crore check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ration Card | खुशखबर ! आता रेशन कार्डसंबंधीत ‘या’ मोठ्या सेवा मिळताहेत ऑनलाइन, जाणून घ्या काय करावे लागेल?

BJP vs Shivsena | ‘सामना’तून अमित शहांसह भाजप नेत्यांवर टीकेचे बाण ! … तर भाजपातील नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकीत ‘पराभूत’

Pune Crime | ‘मॉर्निग वॉक’ला गेल्यानंतर चोरट्यांनी फोडले ‘घर’ ! चोरट्यांचा शहरात वाढला उच्छाद, अवघ्या पाऊण तासात चोरी