Multibagger Stocks | ‘हा’ 25 रुपयांचा शेयर तुम्हाला करू शकतो लखपती, वर्षभरात 9100 टक्के रिटर्न्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Multibagger Stocks | शेअर बाजार सध्या तेजीत आहे. अगदी किरकोळ अशा penny stock ने सुद्धा गुंतवणूकदारांना पैसे कमावून दिले आहेत. पेनी स्टॉक्सची किंमत 25 रुपयांच्या जवळपास असते. सध्या शेअर बाजारात अनेक पेनी स्टॉक असून ते भविष्यात गुंतवणूकदारांना चांगली कमाई देऊ शकतात. गुंतवणुकदारांना पैसे कमावून देणारे हे पेनी स्टॉक (Multibagger Stocks) कोणते ते जाणून घेवूयात…

Flomic Global Logistics – 9,113% रिटर्न

फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्सचा समभाग ऑक्टोबर 2020 पासून 1.24 रुपयांवरुन 114 रुपयांवर गेला. एका वर्षात त्याने गुंतवणूकदारांना 9100 टक्के रिटर्न्स दिला. फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स समुद्री वाहतूक करते.

Adinath Textiles – 4,717% रिटर्न

आदिनाथ टेक्सटाइल्सचा स्टॉक ऑक्टोबर 2020 मध्ये 48 1.48 रुपयांवरून सध्या 71 रूपयांच्या आसपास आहे. गुंतवणूकदारांना 1 वर्षात 4,717 टक्के परतावा मिळाला आहे. ही कंपनी मिश्रित अ‍ॅक्रेलिक आणि धाग्यांची निर्मिती आणि विक्रीचा व्यवसाय करते.

Tata Teleservices – 1,223% रिटर्न

टाटा टेलीसर्व्हिसेसचा स्टॉक ऑक्टोबर 2020 मध्ये 3 रुपयांपासून सध्या 40 रूपयांवर आला आहे. गुंतवणूकदारांना अवघ्या 1 वर्षात 1,223 टक्के परतावा मिळाला. टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड मूलभूत आणि सेल्युलर दूरसंचार सेवा तसेच वायर्ड आणि वायरलेस दूरसंचार क्षेत्रात आहे.

 

RattanIndia Infrastructure – 697% रिटर्न

रतनइंडिया इंफ्रास्ट्रक्चरच्या शेअर्सनी 6 महिन्यात गुंतवणूकादारांना 9 पट रिटर्न दिला. गुंतवणूकदारांचा 800 टक्के फायदा झाला आहे. 30 एप्रिलला कंपनीच्या शेयरची किंमत 4.95 रुपये होती. 4 ऑक्टोबरला तो 44.60 रुपयांवर पोहचला. (Multibagger Stocks)

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title : Multibagger Stocks | these 4 multibagger stocks penny stocks surged rapidly in last one year

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Kolhapur News | पोलीस ठाण्यातच महिलेशी अश्लील वर्तन; कोल्हापुरातील घटनेने खळबळ

Bajaj Finance | पहिल्यांदाच अशी सुवर्णसंधी ! फक्त 101 रुपयात घरी आणू शकता Vivo चा प्रीमियम स्मार्टफोन, जाणून घ्या कधीपर्यंत आहे ऑफर

Sharad Pawar | आगामी निवडणूकांच्या संदर्भात शरद पवार यांचं मोठं विधान, म्हणाले…