अमेरिकेच्या टेक्सासमधील शॉपिंग मॉलमध्ये ‘अंधाधुंद’ गोळीबार, २० जणांचा मृत्यू

टेक्सास : वृत्तसंस्था – टेक्सास येथील एका शॉपिंग मॉलमध्ये शनिवारी काही जणांनी अंधाधुंद गोळीबार केला असून त्यात किमान २० जण ठार झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. अल पासोच्या मेयरने या घटनेला पुष्टी दिली असून तीन संशयितांना ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले आहे. येथील अल पासो शॉपिंग मॉलमध्ये ही गोळीबाराची घटना घडली असून त्यात २० जणांचा मृत्यु झाला आहे तर, २६ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

टेक्सासमधील या घटनेबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, टेक्सासमध्ये गोळीबाराची घटना घडली. त्यात काही लोकांचा मृत्यु झाला ही दु:ख देणारी घटना आहे. अधिकारी कायद्यानुसार काम करीत आहेत. या घटनेबाबत गर्व्हनर यांच्याशी बातचित झाली असून ईश्वर आपल्या सर्वांच्या बरोबर आहे.

स्थानिक टीव्ही चॅनेलने सर्वप्रथम १८ जणांना गोळी लागल्याचे वृत्त दिले होते. मात्र, त्यात किती जणांना मृत्यु झाला याची माहिती देण्यात आली नव्हती.

आरोग्यविषयक वृत्त –