… तरी अजूनही मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्य पदार्थांना बंदीच

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

ऋषिकेश करभाजन

मुंबई उच्च न्यायालयाने मल्‍टीप्‍लेक्‍समध्‍ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी दिली आहे. हा निर्णय मागील महिन्यात कोर्टाने दिला होता. खरेतर त्याची आजपासून अंमलबजावणी होणार होती. याच बाबतचा ग्राउंड रिपोर्ट पोलिसनामाने केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला असताना देखील अजूनही मल्‍टीप्‍लेक्‍समध्‍ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास मल्टिप्लेक्स मालकांनी मज्जाव केला जात आहे. याबाबत १ ऑगस्‍टपासून राज्‍यभरातील मल्‍टीप्‍लेक्‍समध्‍ये यासदंर्भात कारवाई केली जाईल, असे राज्‍य सरकारने सांगितले होते.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पोलिसनामाने पुण्यातील कोथरूड भागातील मल्टिप्लेक्समध्ये जाऊन याबाबत माहिती घेतली असता येथील सिनेमागृहाच्या बाहेर एक सूचना छापली गेली होती. यात स्पष्ट म्हटले होते की, “मुंबई उच्च न्यायालयाने २७ जुन रोजी मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्याबाबत मंजुरी दिली होती. त्याबाबतचे मल्टिप्लेक्स असोसिएशनचे हे स्पष्टीकरण आहे. माध्यमांमधून चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे. उच्च न्यायालयाने असे कोणतेही आदेश पारित केलेले नाहीत कि ज्याद्वारे चित्रपट गृहात बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास अनुमती अथवा खाद्यपदार्थांच्या किमतीवर कोणताही नियंत्रण करणारा आदेश देण्यात आलेले नाहीत. तसेच या कायद्याबाबत कोणतीही अधिसूचना जाहीर केलेली नाही. तरी प्रेक्षकांनी सूचित करू इच्छितो की, माध्यमांवरील अतिशयोक्ती प्रचारावर ,अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखावा.” अशा प्रकारचे स्पष्टीकरण पत्रक लावून दिले आहे.

चित्रपटगृहातील खाद्यपदार्थांच्या किमती आणि बाहेरील खाद्य पदार्थ नेण्यास उच्च न्यायालयाने २७ जून रोजी जनहित याचिका सुनावली होती. त्यात एक ऑगस्ट पासून मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्य पदार्थ नेण्यास असलेली बंदी उठवण्यात आली आहे असे निर्देशित केले होते. आणि याबाबत मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास जर बंदी घातली तर त्या मल्टिप्लेक्स वर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हंटले होते.

शासनाकडून आदेशच नाही त्यामुळे पालन नाही

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्य पदार्थ नेण्याबाबत मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया ने म्हंटले की, ” आम्ही या प्रकरणावर एक याचिका दाखल केली आहे त्याचा निर्णय आजून यायचा बाकी आहे, आम्हाला शासना कडून कुठल्याही प्रकारचा आदेश आम्हाला मिळाल्या नसल्यामुळे आम्ही या प्रकरणावर कुठलीही अंमलबजावणी करणार नाही. असे दीपक अशर ( मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया ) चे अध्यक्ष यांनी म्हंटले आहे. मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्य पदार्थ नेण्यास मात्र मल्टिप्लेक्स मध्ये लहान मुले , आणि रुग्णांना त्याचे खाद्य पदार्थ मल्टिप्लेक्स मध्ये नेण्यास कुठलीही बंदी घालण्यात आलेली नाही. असे असोसिएशन कडून सांगण्यात येत आहे.

तर माणसे स्टाईलने कायदा पाळायला लावू : रुपाली पाटील ठोंबरे

याबाबत पुणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा रुपाली पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, हा कोर्टाचा अवमान आहे. उच्च न्यायालयाने निर्णय दिला असताना देखील मल्टिप्लेक्सचे मॅनेजर बाहेरील पदार्थ नेण्यास मज्जाव करीत असतील तर तो कायद्याचा अवमान आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशनने जरी याचिका दाखल केली असली तरी . उच्च न्यायालयाने या कायद्यावर स्थगिती आणली नाही. त्यामुळे या कायद्याचे पालन मल्टिप्लेक्सना करावेच लागेल . जर तुम्हाला मल्टिप्लेक्स मध्ये बाहेरील खाद्य पदार्थ नेण्यास अडवत असतील तर हे कायद्याचे उल्लंघन आहे. या प्रकरणात प्रेक्षकांना आडवल्यास तुम्ही थेट मनसेकडे या ,आम्ही तुम्हाला न्याय देऊ असे माणसे स्टाईल उत्तर रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिले आहे.