Mulund News | फरसाण न दिल्याच्या कारणावरून PSI ने घेतला सूड; Weekend lockdown चं कारण देत दुकानदारास बेदम मारहाण (व्हिडीओ)

मुंबई / मुलुंड : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Mulund News । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या निर्बंधांमध्ये दुकानाच्या वेळा निश्चित केल्या आहेत. शनिवार आणि रविवार वगळून बाकी दिवस दुपारी चारपर्यंतच दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. म्हणजेच वीकेंड लॉकडाऊन (Weekend lockdown) निश्चित केला आहे. या काळात कोणी दुकाने सुरू केली तर त्यांच्यावर पोलीस प्रशासन (Police administration) कारवाई करतात. मात्र मुंबईच्या मुलुंड (Mulund) ठिकाणी एक अजब प्रकार समोर आला आहे. येथील एका दुकानदाराने वीकेंड लॉकडाऊनमध्ये दुकान (Shop) अर्धवट उघडं ठेवून व्यवसाय केल्याप्रकरणी एका पोलिसाने दुकानदारास बेदम मारहाण केली आहे. कारण मात्र वेगळंच समोर आलं आहे. Mulund News | took revenge for not giving farsan snacks police beat shopkeeper weekend lockdown mulund mumbai

मुलुंड परिसरातील एका दुकानदारानं वीकेंड लॉकडाऊनमध्ये रविवारी सायंकाळी दुकान अर्धवट उघडं ठेवून व्यवसाय करत असल्याने तेथील मुलुंड पोलीस ठाण्याचे (Mulund Police Station) पोलीस उपनिरीक्षक (PSI) सचिन पाटील (Sachin Patil) यांनी संबंधित दुकानदारास बेदम मारहाण केली आहे.
या पोलिसाने काही दिवसांपूर्वी संबंधित दुकानदारास साडेचार हजार रुपयाचं फरसाण मागितलं होता.
परंतु दुकानदाराने फरसाण देण्यास नकार दिला. मात्र, PSI पाटील (Sachin Patil) याने वीकेंड लॉकडाऊनचं कारण देत मारहाण केल्याचा दावा दुकानदार सुनील चौधरी (Sunil Chaudhary) यांनी केलाय.
तसेच, याप्रकरणी दुकानातील कामगाराला मारहाण करतानाचा व्हिडीओ समाज
माध्यमांवर प्रसारित झाला आहे.

https://twitter.com/i_am_Ravindra1/status/1415873430344241155

दुकानातील कामगारांना दुकान उघडं का ठेवलं? असा सवाल करत PSI सचिन पाटील (Sachin Patil) यांनी मारहाण केली.
यानंतर पोलिसांनी संबंधित कामगाराला पोलीस ठाण्यात नेऊन त्या ठिकाणीही बेदम मारहाण केली आहे. तसेच, या मारहाणीत दुकानातील कामगाराच्या कानाला दुखापत झालीय.
अशा घडलेल्या प्रकारानंतर परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम (Prashant Kadam) यांच्याकडे याप्रकरणी तक्रार (Complaint) आली आहे.

या दरम्यान, PSI सचिन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी दुकानदार सुनील चौधरी (Sunil Chaudhary) यांना साडेचार हजार रुपयांचं फरसाण मागितलं होतं.
दुकानदारानं फरसाण देण्यास नकार दिला.
याचा राग मनात धरून PSI पाटील यांनी वीकेंड लॉकडाऊनचं कारण देत दुकानातील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप दुकानदार सुनील चौधरी यांनी आपल्या तक्रारीत (Complaint) केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title : Mulund News | took revenge for not giving farsan snacks police beat shopkeeper weekend lockdown mulund mumbai

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune Fire News | पुण्याच्या बाणेर येथील भारतीय विज्ञान शिक्षा व अनुसंधान संस्थेत भीषण आग, अग्नीशमन दलाचे 5 बंब घटनास्थळी

Mumbai-Nashik Highway | मुंबई-नाशिक महामार्गावर टोमॅटोचा ट्रक उलटला; 20 टन टोमॅटोचा महामार्गावर खच, वाहतूक विस्कळीत (व्हिडिओ)

Surekha Sikri Passes Away | ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन