काय सांगता ! होय, न्यूड होऊन करते ‘ही’ महिला ‘झाडू-पोछा’ मारण्याचं काम, ‘चार्ज’ ऐकून व्हाल सुन्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुमच्या घरात काम करणारी बाई महिन्याला ३ ते ४ हजार रु. घेते. ती घरातील साफसफाईपासून भांडी घासणे, पुसणे अशी कामे करत असेल, पण आज ज्या हाऊस क्लिनरशी आम्ही तुम्हाला भेटवणार आहोत ती तासाला ४५०० रुपयापासून ५००० रु. चार्ज घेते. होय ही हाऊस क्लिनर खूप खास आहे, कारण ती घराची साफसफाई काहीही न घालता म्हणजे न्यूड होऊन करते. आश्चर्यचकित होऊ नका, ब्रिटनमध्ये अशा घरांच्या सफाई कामगारांची क्रेझ वाढत आहे.

न्यूड होऊन करते घरकाम
२५ वर्षाची एमिली निकोल एक न्यूड हाऊस क्लिनर आहे, जी बिना कपडे लोकांच्या घरात काम करते. एमिली या कामासाठी प्रति तासाचे ४५०० रु. ते ५००० रु. चार्ज करते. क्लायंटच्या अटीनुसार घरची साफसफाई आणि बाकीचे काम करताना ती न्यूड असते.

न्यूड हाउस क्लीनर
आपल्या या आगळ्या-वेगळ्या कामाबाबत एमिली म्हणते की, सुरुवातीला त्यांना थोडी अडचण आली, पण तिचे क्लायंट समजूतदार आहेत कि आता त्यांना या कामामध्ये कोणताही संकोच किंवा अडचण नाही. ती पूर्ण घरातील काम नग्न होऊन करते. झाडणे-पुसणे, भांडी आणि साफसफाई दरम्यान अंगावर एकही कपडे नसतात. शरीर झाकण्यासाठी तिच्या हातात फक्त प्लास्टिक ग्लोव्स असतात, जे ती साफसफाई करताना वापरते.

न्यूड होणे नॉर्मल गोष्ट
एमिली म्हणते की, न्यूड होणे एक सामान्य गोष्ट आहे. लिव्हरपूलमध्ये राहणारी एमिली जेव्हा क्लायंटच्या घरात येते तेव्हा पूर्ण कपड्यात असते. पण आपले काम सुरु होण्याअगोदर ती स्वतःला नग्न करते. एमिली म्हणते की, ही माझ्यासाठी सामान्य गोष्ट आहे. मला यात कोणताही संकोच वाटत नाही. ती म्हणते कि आपल्या सगळ्यांच्या कपड्यांच्या आत असे शरीर आहे, म्हणून यात संकोच वाटण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही.

क्लायंटसाठीही असते अट
एमिली म्हणते की, या कामासाठी तिच्या क्लायंटलाही अटींचे पालन करावे लागते. त्यांना माहित असते की, महिला न्यूड होऊन उभी आहे ती सेक्सची वस्तू नाही. त्यामुळे त्यांना या कामात कोणतीही अडचण होत नाही. क्लायंटही कंपनीच्या नियमांचे पालन करण्यास बांधील असतात. ते या महिलांना हात नाही लावू शकत. एमिली म्हणते कि या अटींमुळे तिला सुरक्षित वाटते.

नवरा देतो साथ
एमिली म्हणते की, त्यांची बहीण आणि मित्रांनी या कामासाठी तिची खूप साथ दिली आहे. सुरुवातीला पतीला थोडी अडचण नक्की झाली, पण जेव्हा त्यांना विश्वास बसला कि माझे शोषण नाही होऊ शकत, तेव्हा त्यांनी माझी साथ दिली. एमिली म्हणते की, कुटुंबाचा विश्वास आणि क्लायंटच्या सहकार्यामुळे ती मागच्या पाच आठवड्यांपासून न्यूड क्लिनरचे काम करत आहे.

वाढत आहे न्यूड क्लिनरचे चलन
लंडनमध्ये न्यूड हाऊस क्लिनरची कंपनी चालवणारी लूरा स्मिथ म्हणते की, त्यांना ही आयडिया एका पर्यावरण प्रेमीने दिली होती, ज्याला वाटत होते कि त्यांना असे काम करणारा हेल्पर पाहिजे जो खुल्या विचारांचा असेल आणि प्रकृतीवर प्रेम करेल. या विचारासह लूराने या कंपनीची सुरुवात केली, जिथे आता ८० पुरुष आणि महिला न्यूड हाऊस क्लिनरचे काम करतात. लुरा म्हणते की, ती आपल्या इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे पूर्ण लक्ष देते. ती प्रयत्न करते कि खूप तरुण मुली या कामासाठी निवडल्या जातील. या कामासाठी महिलांचे वय, त्यांची सुंदरता किंवा त्यांचा रंग याचा काही फरक पडत नाही. तसेच पुरुष न्यूड क्लिनरचीही मागणी वाढत आहे.