धक्कादायक ! जुळ्या मुलांना कारमध्येच विसरून गेले वडील ; ८ तासानंतर पाहिले तर सरकली पायाखालची वाळू

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – अनेकांना आपल्या विसराळूपणामुळे अनेक मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु एका व्यक्तीच्या हातून मात्र विसराळूपणामुळे अशी घटना घडली आहे. जिच्यामुळे तो आयुष्यात कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही. न्यूयॉर्क मधील जुआन रोड्रिगुएज नावाचा एक व्यक्ती आपल्या जुळ्या मुलांना उन्हात तापणाऱ्या कारमध्ये विसरून निघून गेला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

जुआनची पत्नी मारिसा रोड्रिगुएज यांनी रविवारी म्हटले की मी या घटनेला कधीच विसरू शकणार नाही आणि मला माहित आहे कि माझे पती देखील स्वतःच्या या चुकीला माफ करू शकणार नाहीत. या महिलेने आपल्या १ वर्षांच्या जुळ्या मुलांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या नवऱ्याला माफ करून साथ देणार असल्याचे म्हटले आहे. या व्यक्तीवर अनावधानाने खून केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

USA

ही घटना शुक्रवारी घडली. जुआन आपली जुळी मुले लूना आणि फिनोक्स यांना डे-केयर मध्ये सोडण्याचे विसरून कारमध्येच ठेऊन नोकरीच्या ठिकाणी निघून गेले. ८ तासांनी जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना मुले मृत झालेली आढळून आली. संध्याकाळी ४ ला कामावरून परतलेले जुआन गाडीत बसून १० मिनिटांपर्यंत गाडी चालवत राहिले. त्यानंतर त्यांना मागील सीटवर मुले आहेत हे लक्षात आले. त्यांच्या तोंडातून फेस निघत असलेला पाहून जुआन घाबरले आणि जोरजोरात ओरडू लागले. आजूबाजूच्या लोकांनी त्यानंतर पोलिसांना बोलावले.

पोलिसांच्या चौकशीत पश्चाताप व्यक्त करत जुआन ने सांगितले की, ‘मला वाटले की मी मुलांना डे केयर मध्ये सोडले आहे आणि त्यानंतर मी कामावर गेलो. मात्र माझ्या या विसराळूपणामुळे माझी मुले मेली. मी आपल्या मुलांची हत्या केली आहे.’ जुआन सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. त्यांनी आपल्याला दोषी न ठरवण्याची विनंती कोर्टाकडे केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त