Coronavirus : चिंताजनक ! 24 तासात 150 नवे रूग्ण तर 9 जणांचा मृत्यू, मुंबईत मृतांची ‘शंभरी’ तर 1549 ‘कोरोना’बाधित

 मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळं राज्यातील परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. मुंबई आणि पुण्यात तर कोरोना व्हायरसनं कहर केला आहे. गेल्या 24 तासात मुंबईत कोरोनाचे तब्बल 150 रूग्ण आढळून आले आहेत तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता आणखी वाढली आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आता 1549 वर जाऊन पोहचली आहे तर महाराष्ट्राचा आकडा हा 2000 पार झाला आहे.

मुंबईत गेल्या 24 तासात 9 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 7 जणांना वेगवेगळे आजार देखील होते मात्र ते कोरोना पॉझिटिव्ह होते. आतापर्यंत मुंबईत 100 जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. आज दिवसभरात 43 जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. आतापर्यंत 141 जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडून देण्यात आलं आहे.