Coronavirus : मुंबईत गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1554 नवे रुग्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोरोनाच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत गेल्या 24 तासामध्ये 1554 नवी रुग्ण आढळून आले असून मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 80 हजारांच्या वर गेली आहे. आज 57 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती म्युनसिपल कॉर्पोरेशन ग्रेटर मुंबई यांनी दिली आहे.

राज्यात कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत गेल्या 24 तासात 1554 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 80 हजार 262 इतकी झाली आहे. तर 57 रुग्णांचा आज मृत्यू झाला असून कोरोनामुळे एकूण 4686 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 24882 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज दिवसभरात 5903 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 50694 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63 टक्के आहे.

 

दरम्यान, मुंबई कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यामुळे जर नागरिकांनी कलम 144 च्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. तर दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी देखील नागरिकांना घरापासून दोन किमी पेक्षा अधिक अंतरावर जाऊ नये असे आवहान केले आहे. तसेच विनाकारण बाईक किंवा गाड्यांमधून फिरताना दिसल्या कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like