मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणारे 36 पैकी 16 मंत्री मोठे साखर कारखानदार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात पाच वर्षानंतर पुन्हा एकदा साखर कारखानदार सत्तेत आले आहेत. सोमवारी ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्या 36 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यातील 16 मंत्र्यांचा संबंध साखर कारखान्यांशी आहे. त्याचे संबंध सहकारी किंवा खासगी स्वरुपातील साखर कारखान्यांशी आहे. ही संख्या मागील सरकारच्या तुलनेत चार पट अधिक आहे. राष्ट्रवादीने आपल्या तंबूतून आठ साखर कारखानदारांना संधी दिली आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटलांचा देखील समावेश आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीशी संबंधित आहेत साखर कारखानदार –
काँग्रेसने देखील अशाच नेत्यापैकी एक असलेल्या अशोक चव्हाण, अमित देशमुख, बाळासाहेब थोरात आणि दोन अपक्ष आमदार शंकरराव गडाख आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते राजेंद्र पाटील यांना मंत्रिपदी बसवले आहे. शिवसेनेकडून शपथ घेणारे शंभूराजे देसाई हे देखील साखर कारखानदार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात साखर कारखानदार मुख्यत: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडले गेले आहेत. निवडणूकीत मोठे यश संपादन करणाऱ्यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाली आहे.

सोमवारी 30 डिसेंबरला ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात एकूण 36 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आदित्य ठाकरे यांना देखील मंत्रिपदाची संधी मिळाली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मंत्र्यांनी शपथ दिली. महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये एकूण 42 मंत्री आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/