धक्कादायक ! बॉलिवूडमध्ये करिअर करायचं होतं पण, तिनं इमारतीवरून उडी मारली – गेला जीव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईमध्ये एका 25 वर्षीय तरुणीनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पर्ल पंजाबी (वय 25) असं या तरुणीचं नाव असून यापूर्वीही तिनं दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

बॉलिवूडमध्ये करिअर होऊ न शकल्यानं ती नैराश्यात होती. ओशिवरातील लोखंडवाला कॉम्प्लेक्स या उच्चभ्रू परिसरातील केन वुड नावाच्या इमारतीवरून तिने उडी मारून आत्महत्या केली आहे.

https://twitter.com/ANI/status/1167226014906249216

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (29 ऑगस्ट) रात्री उशिरा 12.30 वाजण्याच्या सुमारास पर्लचे घरातल्यांसोबत भांडण झाले आणि रागाच्या भरात तिनं इमारतीच्या गच्चीवरून उडी मारली. तिला गंभीर अवस्थेत तातडीनं कोकिलाबेन रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

पर्लला बॉलिवूडमध्ये करिअर करायचे होते. त्यासाठी तिने अनेकदा प्रयत्नही केले होते मात्र तिला त्यात अपयश आले होते. त्यामुळे ती नैराश्यात होती. सध्या ती एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. पर्ल आणि तिच्या आईमध्ये वारंवार वाद होत असत, अशीही माहिती समोर आली आहे. पर्लचं मानसिक आरोग्य ठीक नव्हतं. यापूर्वीही तिनं दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –