Mumbai 26/11 Terror Attack | पुणेकर आणि शहर पोलिसांकडून 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना मानवंदना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai 26/11 Terror Attack | 26 नोव्हेंबर 2008 हा दिवस भारताच्या इतिहासात काळा दिवस म्हणून गणला जातो. या दिवशी लश्करे तैयबा या अतिरेकी संघटनेने मुंबईवर हल्ला करुन शेकडो निरपराध लोकांचे बळी घेतले. या दहशतवाद्यांशी लढताना अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना वीर मरण आले. याच दिवसाचे स्मरण करत या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून उभारण्यात आलेल्या स्तंभाला (Mumbai 26/11 Terror Attack) बँडच्या माध्यमातून मानवंदना देण्यासाठी पुणे पोलीस दलासह पुणेकर मोठ्या संख्येने सारसबागेत जमा झाले होते. पुणे पोलीस दलाने बँडच्या माध्यमातून शहिदांना आदरांजली अर्पण केली. शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह सर्व अधिकारी,
मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सारसबाग येथे झालेल्या मानवंदनेनंतर जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या धाडसाला मानवंदना देण्यासाठी पोलीस दलाच्या पुढाकाराने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो.

याशिवाय देशभक्तीपर आणि सामाजिक विषयांवरील कल्पना विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून मांडाव्यात,
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत होण्यासोबतच शहिदांना श्रद्धांजली अर्पण करावी याकरीता चित्रकला स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले होते.

Web Title :-Mumbai 26/11 Terror Attack | mumbai 2611 terror attack martyrs tribute by pune police band drawing competition pune cp amitabh gupta

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकावर बोपदेव घाटात गोळीबार, शहरातील गोळीबाराची तिसरी घटना

Pune Rural Police | पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्या मुलीने एव्हरेस्टचा बेस कॅम्प 7 दिवसात केला सर

Baba Ramdev Controversy | ठाण्यातील वक्तव्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची रामदेव बाबांना नोटीस