दुर्दैवी ! कॅन्सरशी झुंज सुरु असलेल्या 4 वर्षीय मुलीचा लोकलमधून पडल्याने मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईत लोकलमधून पडल्याने एका चार वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नेहा ढगे असं मृत मुलीचं नाव असून ती कॅन्सरवरील उपचारासाठी मुंबईला आली होती. तिच्या अशा दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मूळ विदर्भाचे ढगे कुटुंब पाच महिन्यांपासून नेहाच्या उपचारासाठी मुंबईत होते. नेहावर केमोथेरपी आणि अन्य उपचार सुरु होते. नेहा कॅन्सरवरील उपचारासाठी आपल्या आईसोबत चेंबूर स्टेशनवर आली होती. गर्दीच्या ट्रेनमध्ये चढताना गर्दीच्या रेट्यामुळे दोघीही प्लॅटफॉर्मवर पडल्या. त्यात नेहा गंभीर जखमी झाली होती. प्लॅटफॉर्मवर पडल्यानंतर नेहाच्या तोंडातून आणि कानातून रक्तस्त्राव सुरु झाला. तिच्या हातांना आणि पायालाही मार लागला. तिच्या आईच्या डोळ्यांना मार लागला होता.

रेल्वे पोलिसांनी दोघींना तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र गंभीर जखमी झालेल्या नेहाचा आयसीयूमध्ये असताना मृत्यू झाला. कॅन्सरशी सुरु असणारी तिची झुंज लोकलच्या गर्दीने संपवली.

Loading...
You might also like