Mumbai News : मुंबईत नवजात बालकांच्या खरेदी-विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टर, नर्ससह 9 जणांना अटक

मुंबई (Mumbai ) : क्राइम ब्रँचने एका अशा टोळीचा पर्दाफाश केला आहे, जी नवजात बालकांची विक्री आणि खरेदीचे काम करत होती. या प्रकरणात पोलिसांनी 9 लोकांना अटक केली आहे, ज्यामध्ये 7 महिला आणि 2 पुरुष आहेत. अटक आरोपींपैकी एक डॉक्टर, एक नर्स आणि एक लॅब टेक्नीशियन सुद्धा आहे.

क्राइम ब्रँच युनिटचे अधिकारी योगेश चव्हान यांनी सांगितले की, ही टोळी बालकांच्या जन्मदात्यांकडून बालकांना 60 हजार रुपये ते दिड लाख रुपयापर्यंत खरेदी करत होती आणि नंतर अडीच ते साडेतीन लाख रुपयापर्यंत अशा जोडप्यांना विकत होते ज्यांना मुल नाही.

अटक केलेल्या आरोपींची नावे रुपाली वर्मा (30), निशा अहिरे (38), गुलशन खान (34), गीतांजली गायकवाड (38)(ही एका हॉस्पीटलमध्ये नर्स आहे), आरती सिंह (29) (हा एका हॉस्पीटलमध्ये लॅब टेक्नीशियन आहे) आणि धनंजय बोगे (58) (हा एक बीएचएमएस डॉक्टर आहे, ज्याचे लोअर परळमध्ये क्लिनिक आहे) अशी आहेत. पोलिसांनी तीन आरोपींची नावे गुप्त ठेवली आहेत, कारण यापैकी दोन आरोपी मुलांचे जन्मदाते आहेत, तर एक आरोपी ज्याने बालकाला खरेदी केले आहे आणि त्याचे पालन पोषण करत आहे.

कसा झाला खुलासा ?
चव्हाण यांनी सांगितले की, त्यांना माहिती मिळाली होती की, बांद्राच्या खेरवाडी परिसरात काही लोकांनी बालकांना विकले आहे तर कुणी विकण्यासाठी मदत केली आहे, ज्यानंतर आम्ही तिथे ट्रॅप लावून तीन लोकांना ताब्यात घेतले आणि चौकशी केली. चौकशीत या संपर्ण टोळीची माहिती मिळाली.

ही टोळी कशी काम करत होती?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले डॉक्टर, नर्स आणि लॅब टेक्नीशियन या टोळीचे मुख्य सदस्य आहेत. ते अशा लोकांचा शोध घेत असत ज्यांना मुल हवे आहे पण मोठ्या कालावधीपासून मुलबाळ होत नव्हते. याशिवाय ते अशा लोकांचाही शोध घेत असत जे मुलांचे पालन पोषण करण्यास असमर्थ आहेत. या गोष्टींचा शोध घेतल्यानंतर ते ही माहिती आपल्या टोळीतील दलालांना देत असत आणि नंतर दलाल दोन्ही जोडप्यांना बालक विकणे आणि खरेदी करण्यासाठी तयार करण्यास सुरूवात करत असत.

हे दलाल मुल हवं असलेल्या जोडप्याकडून अडीच ते तीन लाख रूपयांची मागणी करत असत आणि ज्यांच्याकडे बालक जन्माला आले आहे, त्यांना मुल विकण्याच्या बदल्यात 60 हजारापासून दिड लाख रूपयांपर्यंत ऑफर देते होते आणि उर्वरित रक्कम हे लोक आपसात कामाच्या आधारावर वाटून घेत होते. प्राथमिक तपासात तीन बालकांचा शोध क्राइम ब्रँचने लावला आहे, जी अवैध प्रकारे या टोळीच्या माध्यमातून विकली गेली होती.

तपासात समजले की, मागील 6 वर्षापासून ही टोळी कार्यरत होती आणि एकट्या गीतांजलीने, जी नर्स आहे, तिने आतापर्यंत 6 बालकांची विक्री केली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींचे मोबाइल फोन जप्त केले आहेत आणि फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत, ज्याद्वारे हे समजले जाऊ शकते की, या लोकांनी आतापर्यंत किती बालकांची अशाप्रकारे डिलिंग केली आहे.

मुलांसोबत काय होत होते?
क्राइम ब्रँचच्या सूत्रांनुसार, या टोळीच्या जाळ्यात तेच लोक फसत होते जी जोडपी संतती प्राप्तीसाठी सर्व प्रयत्न करून थकली होती. एका अधिकार्‍याने सांगितले की, हे लोक या मुलांना इतक्या प्रेमाने सांभाळत होते की, तेच त्यांचे जन्मदाते असावेत. एका कुटुंबाच्या तीन पीढ्यांमध्ये कधीच मुलगी जन्माला आली नव्हती, ज्यानंतर या लोकांनी या टोळीच्या मदतीने मुलगी खरेदी केली आणि तिला खुप प्रेमाने वाढवत होते आणि तिचा प्रत्येक लाड पुरवत होते, जे तिचे खरे आई-वडिलही करू शकले नसते. पोलिसांना यातील एका प्रकरणात असे आढळून आले की, एका जोडप्याने आपल्या नातेवाईकांकडून पैसे उधार घेऊन बाळ खरेदी केले होते आणि त्याला नजरेआड होऊ देत नव्हते.