Video : मुंबईतील ‘या’ 99 वर्षाच्या आजी तयार करतायेत प्रवासी मजुरांसाठी फूड पॅकेट्स, व्हिडीओ पाहून डोळयात येईल पाणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना व्हायरस साथीच्या प्रादुर्भावाविरूद्ध लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील आज शेवटचा दिवस आहे, असे असूनही ना ही कोविड – 19 संसर्गाच्या घटनांमध्ये कोणतीही घट होत आहे , नाही स्थलांतरित कामगारांच्या स्थलांतरणाची प्रक्रिया संपत आहे. देशातील बऱ्याचं शहरांप्रमाणे परप्रांतीय कामगार मुंबईवरून मोठ्या प्रमाणात स्थलांतर करीत आहेत. दरम्यान, मुंबई प्रवासी मजुरांसाठी फूड पॅकेट तयार करणार्‍या 99 वर्षांच्या महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला आपल्या घरात जेवणाच्या टेबलावर बसून प्रवासी मजुरांसाठी खाद्यपदार्थांची पाकिटे तयार करताना दिसत आहे.

वृद्ध महिलेचा हा व्हिडिओ जाहिद एफ. इब्राहिम नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने शेअर केला आहे. यासह कॅप्शनमध्ये लिहिले कि, माझी 99 वर्षीय आत्या मुंबईतील प्रवासी मजुरांसाठी जेवणाचे पाकिटे तयार करीत आहे. या व्हिडिओने लोकांची मने जिंकली आहेत आणि याला सोशल मीडिया वापरकर्ते खूप पसंत करत आहेत. हा व्हिडिओ 29 मे रोजी सामायिक करण्यात आला होता, ज्याने लोकांच्या मनाला अशा प्रकारे स्पर्श केला की, लोक या वृद्ध महिलेचे कौतुक करत आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, एक वृद्ध महिला कशी टेबलावर खाद्यपदार्थांची पाकिटे तयार करीत आहे, जेणेकरून कोरोना संकटाच्या या काळात प्रवासी भुकेने मरणार नाही. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या बाबतीत महाराष्ट्रात अत्यंत वाईट परिस्थती आहे, कारण येथे कोविड – 19 संसर्ग इतर राज्यांपेक्षा खूप वेगाने पसरत आहे. राज्यात आतापर्यंत संसर्गाची 65,168 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर मृतांचा आकडा 2197 पर्यंत वाढला आहे. दरम्यान, 28,081 रूग्ण उपचाराद्वारे बरे झाले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like