मुंबई : वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात तिघांकडून 19 वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एका 19 वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला आहे. वांद्रे येथील बँडस्टँड भागात मंगळवारी (दि. 11) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. बॉलीवूडमधील एका बड्या सेलिब्रिटीच्या घराजवळ ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे समुद्रकिनारी फिरायला बंदी असतानाही गोवंडीत राहणारी 19 वर्षीय तरुणी मंगळवारी रात्री 3 मित्रांसह दुचाकीवरून बँडस्टँड येथे आली होती. येथील खडकाआड मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास बदनामीची भीती घातली. काही दिवसांनी तरुणीच्या पोटात दुखू लागल्याने तिने घडलेला प्रकार बहिणीला सांगितला. त्यानंतर तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार पाेलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवून तिघांना अटक केली आहे. अटक केलेले आरोपी 18 ते 21 वयोगटातील आहेत. शिवाजीनगर पोलीस तपास करत आहेत.