Mumbai AC Local Luggage Rack Crashed | एसी लोकलमधील लगेज रॅक कोसळला; पश्चिम रेल्वेने घेतली गंभीर दखल

0
134
Mumbai AC Local Luggage Rack Crashed | luggage rack crashed in ac local in mumbai on western railway no injured
File Photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Mumbai AC Local Luggage Rack Crashed | पुन्हा एकदा एसी लोकल वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यात (Thane) एसी लोकलचे दरवाजे उघडले नव्हते. त्यानंतर आता एसी लोकलामधील लगेज रॅक कोसळला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत पश्चिम रेल्वेने (Western Railway) तातडीने हा लगेज रॅक दुरुस्त केला आहे. तसेच या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर इतर एसी लोकलच्या लगेज रॅक तपासणीचे आदेश देण्यात आले आहे. (Mumbai AC Local Luggage Rack Crashed)

 

 

काय घडले नेमके ?

बुधवारी 21 सप्टेंबर रोजी 7 वाजून 49 मिनिटांनी हि एसी लोकल विरारसाठी निघाली होती. तेव्हा एका कोचमध्ये एक लगेज रॅक खाली कोसळला. या ट्रेनमधील एक प्रवासी संतोष मिश्रा (Santosh Mishra) यांनी या रॅकचा फोटो ट्विट करून पश्चिम रेल्वेकडे तक्रार दाखल केली. रॅक खालील नट बोल्ट निघाल्याने हा रॅक खाली कोसळल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

 

दरवाजे उघडलेच नाहीत

17 सप्टेंबर रोजी रात्री सीएसएमटीहून ठाण्यासाठी निघालेली हि एसी लोकल ठाण्याला पोहोचली असता
या गाडीचे दरवाजेच उघडले नाहीत.
ट्रेन गार्डच्या चुकीमुळे ही घटना घडली आहे.
गार्डच्या या चुकीचा फायदा प्रवाशांना सहन करावा लागला होता.

 

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा