Mumbai ACB Trap | 8.50 लाख रुपये लाच घेताना BMC चा दुय्यम अभियंता ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनधिकृत बांधकामावर (Unauthorized Construction) निष्कासन कारवाई न करण्यासाठी 9 लाख रुपयांच्या लाचेची मागणी (Demand a Bribe) करुन 8 लाख 50 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting a Bribe) मुंबई महानगरपालिकेतील दुय्यम अभियंत्यासह (BMC Second Engineer) एका खासगी व्यक्तीला बृहन्मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Mumbai ACB Trap) रंगेहात पकडले. दुय्यम अभियंता मोहन रामू राठोड Mohan Ramu Rathod (वय-42) आणि खासगी व्यक्ती मोहम्मद शोएब मोहम्मंद रजा खान (वय-40) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. याप्रकरणी मुंबई एसीबीने (Mumbai ACB Trap ) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) वांद्रे पश्चिम येथील ‘एच-पश्चिम’ विभाग कार्यालयात मोहन रामू राठोड दुय्यम अभियंता म्हणून कार्यरत आहेत. याबाबत चॅपल रोड (Chapel Road) परिसरातील एका व्यक्तीने मुंबई एसीबीकडे (Mumbai ACB Trap) सोमवारी (दि.6) प्रत्यक्ष हजर राहून तक्रार दिली होती.

 

तक्रारदाराचे चॅपल रोड येथे दोन मजल्यांचे घर आहे. 16 जानेवारी 2023 रोजी महानगरपालिकेने तक्रारदाराच्या घराच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर निष्कासन कारवाई करण्याची नोटीस बजावली होती.
त्यानंतर तक्रारदार यांनी वांद्रे येथील महानगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन राठोड यांची भेट घेतली.
त्यावेळी राठोड यांनी कारवाई न करण्यासाठी 15 लाखांची मागणी केली.
तक्रारदाराची पैसे देण्याचे इच्छा नसल्यामुळे त्यांनी मुंबई एसीबीकडे तक्रार केली.

मुंबई एसीबीने पंचासमक्ष मंगळवारी (दि.7) पडताळणी केली असता राठोड यांनी 9 लाख रुपयांची मागणी केली
व तडजोडीअंती खासगी व्यक्तीमार्फत 8 लाख 50 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार मंगळवारी एसीबीने सापळा रचून खासगी व्यक्ती खान याला साडेआठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून
दोन्ही आरोपींना अटक (Arrest) करण्यात आली आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त विजय पाटील (Addl SP Vijay Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली
बृहन्मुंबई एसीबीचे सहायक पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील (ACP Sanjay Patil) यांच्या पथकाने केली.

Web Title :-  Mumbai ACB Trap | 8.50 lakh rupees bribe: BMC sub-engineer in anti-corruption trap

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Bypoll Election | एवढीच ताकद होती तर टिळक, घाटे, बापट यांना निवडून आणण्यात काय अडचण होती ?

Pune Crime News | कोरोना, लॉकडाऊनपासून बंद पडलेल्या पण आता सुरू झालेल्या ‘एमओबी’मध्ये 20 गुन्हेगारांची ‘परेड’

Repo Rate Hiked | आरबीआयचा सर्वसामान्यांना पुन्हा झटका, रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ; तुमचा EMI कितीने वाढणार? जाणून घ्या