Mumbai ACB Trap | 15 लाख रुपये लाच घेताना वस्त्रउद्योग विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अपिलाचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी मुंबई वस्त्रउद्योगाचे (Textile Department) प्रादेशिक उपा आयुक्त (Regional Deputy Commissioner) अजितकुमार सासवडे (Ajitkumar Saswade) यांना 15 लाख रुपये लाच घेताना (Accepting a Bribe) बृहन्मुंबई लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने (Mumbai ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. वस्त्रउद्योगमधील मोठ्या अधिकाऱ्यार मुंबई एसीबीने (Mumbai ACB Trap) कारवाई केल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही कारावाई बुधवारी (दि.1) करण्यात आली. (Mumbai Bribe Case)

याबाबत तक्रारदार यांनी बृहन्मुंबई एसीबीकडे (Mumbai ACB Trap) मंगळवारी (दि.31 जानेवारी) लेखी तक्रार केली होती. तक्रारदार यांनी दि पक्का रंग साडी को. ऑफ. असोसिएशन लि. मालेगाव येथे शेअर होल्डर (Shareholder of Pakka Rang Saree Co-Operative Association Limited) होण्यासाठी शेअर्सची फी भरुन संस्थेकडे अर्ज केला होता. मात्र तक्रारदार यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. याबाबत तक्रारदार यांनी मुंबई वस्त्रउद्योग, प्रादेशिक उप आयुक्त अजितकुमार सासवडे यांच्याकडे अपिल केले होते. तसेच अपिलाच्या अनुषंगाने तक्रारदार आणि इतर 20 लोकांनी उच्च न्यायालयात (High Court) रिट पिटीशन दाखल केली होती.

या रिट पिटीशनवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने प्रादेशिक उप आयुक्त सासवडे यांना 4 फेब्रुवारी पूर्वी अर्ज निकाली काढावा असे आदेश दिले होते. या अर्जावर तक्रारादर यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी सासवडे यांनी
30 लाखाची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी बृहन्मुंबई एसीबीकडे तक्रार केली.

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता, सासवडे यांनी अपिल अर्जावर त्यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी 30 लाख रुपये लाचेची मागणी करुन 15 लाख रुपये आणुन देण्यास सांगितले. त्यानुसार पथकाने बुधवारी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 15 लाख रुपये घेताना अजितकुमार सासवडे यांना रंगेहात पकडण्यात आले.
सासवडे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Prevention of Corruption Act)
गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त विजय पाटील (Mumbai ACB Addl SP Vijay Patil)
यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई एसीबीच्या पथकाने केली.

 

Web Title :- Mumbai ACB Trap | Regional Deputy Commissioner of textile deptarrested
for accepting bribe of 15 lakhs Mumbai ACB Trap

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chinchwad Bypoll Elections | अजित पवारांनी मुलाखत घेण्याआधीच राष्ट्रवादीच्या नेत्याने विकत घेतले नामिर्देश पत्र, राजकीय चर्चांना उधाण

Chinchwad Bypoll Elections | अजित पवारांनी मुलाखत घेण्याआधीच राष्ट्रवादीच्या नेत्याने विकत घेतले नामिर्देश पत्र, राजकीय चर्चांना उधाण