मुंबई दुर्घटना : राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. मालाडमध्ये पिंपरीपाडा परिसरात घरांवर भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार कोसळत आहे. यामुळे राज्यभर पावसाने थैमान घातलं असताना पुणे आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात अपघात होऊन जवळपास ३० लोकांचा आतापर्यंत जीव गेला आहे.

शनिवारी पुण्यातील कोंढवा भागात इमारतीची सरंक्षक भिंत कोसळून झालेल्या अपघातात १७ कामगारांचा जीव गेला होता. त्यानंतर आज कात्रजमधील भागात भिंत कोसळून ६ कामगारांचा जीव गेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन नागरिकांचे जीव जात असताना प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. अशाच प्रकारची घटना मालाडमध्ये पिंपरीपाडा परिसरात घरांवर भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली देखील अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याचबरोबर याठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु असून एनडीआरएफ, अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. मात्र मुसळधार पावसामुळे बचावकार्यात मोठा अडथळा येत असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे राज्यात शनिवारपासून आतापर्यंत विविध अपघातात आणि दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला असून येत्या चार ते पाच दिवस राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –

‘नाईट शिफ्ट’मध्ये काम करत आहात, मग ‘हे’ पदार्थ अवश्य खा

जाणून घ्या आरोग्यवर्धक ‘जवसाचे’ फायदे

लठ्ठपणाचा रोगप्रतिकारक शक्तीवर होतो परिणाम, काळजी घेणे गरजेचे

‘या’ घरगुती उपयांनी करा चेहरा मॉइश्चरायईज