सुशांत सिंह राजपूत केसच्या ‘त्या’ 3 गोष्टी ज्या सुसाइड थेअरीच योग्य असल्याचे दर्शवतात, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात सीबीआयचा तपास वेगाने पुढे सरकत आहे. यामध्ये अनेक खुलासे होत आहेत. परंतु, विचार करण्यासारखी बाब म्हणजे तपासादरम्यान अजूनपर्यंत असा एकही ठोस पुरावा समोर आलेला नाही, जो सुशांतच्या आत्महत्येला खून असल्याचे सिद्ध करू शकतो. या प्रकरणाच्या तीन बाजू अशाही आहेत, ज्या सुशांतच्या मृत्युच्या थेअरीला सुसाइडकडे घेऊन जातात. त्या तीन गोष्टी कोणत्या ते जाणून घेवूयात.

मजबूत होता गळफास बनवलेला कपडा
14 जूनरोजी सुशांतचा मृतदेह एका हिरव्या रंगाच्या कपड्याच्या फासावर लटकत होता. तपासात समजले की, सुशांतनेच हा फास बनवला होता. हे कापड दोनशे किलोपर्यंत वजन सहज उचलू शकते. फास बनवून सुशांतनेच आपल्या गळ्यात अडकवल्याचे दिसत आहे, कारण बेडवर उभे राहून सुशांत आणि पंख्यामधील अंतर अवघे एक इंच होते, गळ्यात फास अडकवून तो बेडच्या मोकळ्या जागेकडे लटकला होता.

त्या खोलीत अवघड नव्हती सुसाइड
खोलीच्या छताला लावलेला पंखा आणि बेडमधील अंतर 5 फुट 11 इंच होते. तर सुशांतची हाइट 5 फुट 10 इंच होती. म्हणजे बेडवर उभे राहिल्यानंतर सुशांत आणि पंख्यात अवघा 1 इंचाचा फरक राहातो. बेडच्या ज्या दुसर्‍या बाजूला त्याचा मृतदेह लटकत होता तेथून पंख्याची उंची 8 फुट 1 इंच होती. एकुणच स्थिती आत्महत्येसाठी अवघड नव्हती.

सुशांतच्या गळ्यावर होते कपड्याचे व्रण
पोस्टमार्टममध्ये आढळले की, त्याच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती. दोन्ही हाताची नखे सुद्धा स्वच्छ होती. फॉरेन्सिक टीमने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, सुशांतच्या गळ्यावर जे व्रण होते, ते त्याच कपड्याचे होते ज्या हिरव्या कपड्याने सुशांतने फास लावून घेतला. यातून स्पष्ट होते की, सुशातने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली असावी.

मुंबई पोलिसांनी सर्व गोष्टींचा फॉरन्सिक तपास केला आहे. पण, सुशांतच्या कुटुंबियांचा मुंबई पोलिसांच्या तपासावर विश्वास नव्हता. कुटुंबियांच्या मागणीनंतर ही केस सीबीआयला देण्यात आली. आता सीबीआयची एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे.