विश्वासदर्शक ठरावानंतर अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीने आज विश्वासदर्शक ठराव 169 विरुद्ध 0 ने जिंकला. विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर भाजपने शपथविधी हा घटनेला अनुसरून नल्याचा दावा करत आक्षेप घेतला. हंगामी विधानसभा अध्यक्षांनी भाजपचा हा दावा फेटाळून लावल्यानंतर भाजपने सभात्याग केला. विधानसभा परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, घडणाऱ्या गोष्टी खुल्या मनाने स्विकारल्या पाहिजेत. सुसंस्कृत महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी सर्वांनी हातभार लावला पाहिजे, असे म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत सीपीआयच्या उमेदवारांना आघाडीचा पाठिंबा होता. आघाडीच्या पाठिंब्यावर सीपीआयचे उमेदवार निवडून आले. मात्र, आज मतदानाच्यावेळी त्यांनी आम्हाला मतदान केले नाही. तर चार जणांनी तटस्थ भूमिका घेतली. आघाडी सरकारची पहिली परीक्षा पार पडली आहे. आता उद्या दुसरी परीक्षा होणार आहे. उद्या विधानसभेच्या अध्यक्षांची निवड होणार असून यामध्ये देखील आम्ही पास होऊ असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे कौतुक करायला हेवे होते
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांचे 25 वर्षापासून मित्र होते. त्यांनी अनेक निवडणुका एकत्र लढल्या आहेत. उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा विधानसभेत आले होते. त्यांना आमदारांचा पाठिंबा असल्याने त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपने आपल्या जुना मित्र उद्धव ठाकरे यांचे कौतुक करायला पाहिजे होते. त्यांच्यामागे किती आमदार आहेत हे पहायला पाहिजे होते. मात्र, त्यांनी सभात्याग केला. यावेळी पत्रकारांनी उपमुख्यमंत्री पदाबाबत विचारले असता त्यांनी याला उत्तर देणे टाळले.

Visit : Policenama.com