Mumbai-Agra Highway Accident | मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; 3 ठार तर 9 जण जखमी

धुळे : पोलीसनामान ऑनलाइन – Mumbai-Agra Highway Accident | धुळे जिल्ह्यात (Dhule News) मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात (Mumbai-Agra Highway Accident) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन गाड्या एकमेकांना धडकल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू (Died) झाला आहे. तर नऊ जण जखमी (Injured) झाले आहेत. ही घटना सोमवारी रात्रीच्या दरम्यान घडली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, ट्रक (Trucks), ॲपे रिक्षा (Rickshaws) आणि क्रूझर (Cruisers) गाड्या एकमेकांना धडकून विचित्र अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षा आणि क्रूझर गाडीचा चक्काचूर झाला आहे. या घटनेबाबत माहिती समजताच पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाले आहे. तिन्ही गाड्यांमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर चक्क क्रेनच्या सहाय्याने या गाड्या वेगळ्या करण्यात आल्या आहेत. (Mumbai-Agra Highway Accident)

दरम्यान, धुळे तालुका पोलिसांनी (Dhule Taluka Police) रात्री मदतकार्य करत जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
अपघातातील जखमींवर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात (Hire Medical College) उपचार करण्यात येत आहे.
अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघात झालेली वाहने बाजुला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

 

 

Web Title :- Mumbai-Agra Highway Accident | dhule major accident on mumbai agra highway three vehicles collied each other 3 died 9 injured

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा