Mumbai Ahmedabad Bullet Train | बुलेट ट्रेन समोर नवीन अडथळा, गोदरेज कंपनीचे राज्य सरकार विरोधात प्रतिज्ञापत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai Ahmedabad Bullet Train) प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली भूसंपादन प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा गोदरेजने मुंबई हायकोर्टात केला आहे. गोदरेज अ‍ॅण्ड बॉईस (Godrej and Boyce) कंपनीने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. प्रकल्पाच्या (Mumbai Ahmedabad Bullet Train) भूसंपादन प्रक्रियेत गोदरेज कंपनीच अडथळे आणत आहे, त्यामुळे प्रकल्पास उशीर करत असल्याचा महाराष्ट्र सरकारचा आरोप कंपनीने या प्रतिज्ञापत्रात खोडून काढला आहे.

 

बुलेट ट्रेनसाठीच्या जागेकरता राज्य सरकार गोदरेज कंपनीला 264 कोटींच्या नुकसानभरपाई देण्याचे ठरले होते.
नुकसानभरपाईची सुनावणी होऊन आता 26 महिन्याहून अधिकचा कालावधी उलटून गेलाय.
त्यामुळे कायद्यातील तरतूदीनुसार जुन्या दरानं झालेला जमीन अधिग्रहणाचा हा करार आता रद्द होतो.
असा दावा कंपनीने केला आहे. तर राज्य सरकारने, हा प्रकल्प (Mumbai Ahmedabad Bullet Train) चार वर्ष रखडल्यामुळे जोपर्यंत हा वाद निकालात निघत नाही, तोपर्यंत नुकसानभरपाईची रक्कम कोर्टात जमा करण्याची परवानगी मागितली आहे.

 

विक्रोळीतील 3 हजार एकरच्या जागेच्या मालकीवरून साल 1973 सालचा राज्य सरकार आणि गोदरेज यांच्यातील वादही अद्याप प्रलंबित आहे.
ज्यामुळे जनतेच्या हितासाठी उभारण्यात येणारा बुलेट ट्रेन प्रकल्पही रखडला आहे, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे.
हायकोर्टानं या प्रकरणाची सुनावणी 21 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे.

 

Web Title :- mumbai ahmedabad bullet train project rs 264 cr compensation a fraction of amount offered earlier says godrej boyce

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrashekhar Bawankule | संजय राऊत सुटल्यावर जल्लोष करणे योग्य नाही, त्यांना फक्त जामीन मिळाला आहे – चंद्रशेखर बावनकुळे

Yashomati Thakur | अफवा पसरविणे भाजपचे काम आहे, स्वातंत्र्यांच्या काळात देखील ते तेच करत होते – यशोमती ठाकूर

Virat Kohli | विराट कोहलीची मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी, क्रिकेट विश्वात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

Mahesh Tapase | भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा उपयोग विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी करत आहे का? – महेश तपासे

Pune Crime | बंडगार्डन आणि फरासखाना पोलीस ठाण्यच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, मॅस्केलाईन आणि एमडी जप्त