Mumbai Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Ahmedabad Highway Accident) कार आणि लक्झरी बसचा असाच एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बाकी जखमी प्रवाशांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात (Mumbai Ahmedabad Highway Accident) मृत पावलेल्यांमध्ये एका महिलेचादेखील समावेश आहे.
डहाणू तालुक्यातील चारोटीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असेलल्या महालक्ष्मी मंदिराजवळ पहाटे तीन-साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात (Mumbai Ahmedabad Highway Accident) झाला आहे. गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने लक्झरी बसला जोरदार धडक दिली. हि धडक एवढी भीषण होती कि कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर लक्झरी बसचालकासह अन्य तीन प्रवाशी जखमी झाले आहेत.
Maharashtra | Four people died on spot in a collision between a car and a bus on Mumbai-Ahmedabad highway in Dahanu area of Palghar district. The car was enroute Mumbai from Gujarat and rammed into the bus after the car driver lost control of the vehicle: Palghar Police pic.twitter.com/PMa8bXfrAa
— ANI (@ANI) January 31, 2023
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद अब्दुल कलाम सलाम हाफिज (36), इब्राहिम दाऊद (60), आशियाबेन कलेक्टर (57),
इस्माईल मोहम्मद देराय (42), अशी या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
कारमधील चारही प्रवासी हे गुजरातच्या बारडोली मधील रहिवाशी होते.
या अपघातातील (Accident News) जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात कारचे आणि बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Web Title :- Mumbai Ahmedabad Highway Accident | car collided with a bus on
the mumbai ahmedabad highway 4 people died on the spot
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime News | चार्टर्ड अकाउंटंट यांना कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन 30 लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक
- Sangli ACB Trap | 1.5 लाखाची लाच स्वीकारताना महसुल विभागातील 2 मोठे मासे अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
- ED Raid On Vinay Aranha | पुण्यातील नामांकित रोझरी स्कूलचे संचालक विनय आर्हाना यांच्या बंगल्यावर आणि ऑफिसवर ईडीचा छापा, ED नं केली कसून चौकशी