Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खाद्यतेलाच्या टँकरचा (Edible oil Tankers) अपघात झाल्याची घटना (Mumbai-Ahmedabad Highway Accident) घडली आहे. हा अपघात तवा व सोमटा या पालघर तालुक्यातील गावाजवळ झाला आहे. टँकर पलटी झाल्यानंतर टँकरमधून तेल गळती सुरू झाली. दरम्यान यावेळी परिसरातील गावकऱ्यांची तेल गोळा करुन घेऊन जाण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. (Edible oil tanker overturns on Mumbai-Ahmedabad highway)

गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर खाद्यतेल घेऊन जाणाऱ्या या ट्रकचा अपघात घडला. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. टँकर उलटल्यानंतर त्यामधून तेल गळती सुरू झाली असून तेल रस्त्यालागत खड्ड्यामध्ये गोळा होत आहे. दरम्यान, गळती होणारे तेल गोळा करण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड उडाली आहे. घरातील भांडीकुंडी, हांडे, कॅन घेऊन तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे. (Mumbai-Ahmedabad Highway Accident)

Web Title : Mumbai-Ahmedabad Highway Accident | palghar edible oil tanker accident local people came to collect oil

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त