BMC नं ‘महानायक’ अमिताभ यांचे चारही बंगले केले सील, कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : बृहन्मुंबई महानगरपालिकेने बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील चार बंगल्यांना सील केले आहे. चारही बंगल्याना कोरोना प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. महापालिकेची टीम बंगल्याची चौकशी करत आहे. बच्चन कुटुंबियांचे चार बंगले- जलसा, प्रतीक्षा, जनक आणि वत्स यांना कोविद – 19 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले गेले आणि त्यांना सील करण्यात आले आहे. याशिवाय बीएमसीने सर्व बंगल्यांमध्ये उपस्थित असलेल्या कर्मचार्‍यांचे निर्जंतुकीकरण केले असून अन्य आवश्यक तपासणीही करण्यात आल्या आहेत. तसेच अमिताभ बच्चन यांच्या चार बंगल्यांमध्ये वैद्यकीय पथकही उपस्थित असून सर्व बंगल्यांच्या कर्मचाऱ्यांना स्क्रीन देखील केले जात आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन बच्चन फॅमिलीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

याआधी, बीएमसीचे स्वच्छता कर्मचारी रविवारी सकाळी सॅनिटायझेशनसाठी मुंबईतील अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’या बंगल्यात पोहोचले होते. एका अहवालानुसार, अमिताभ बच्चन यांचे बंगले असलेले क्षेत्र मुंबईतील सर्वात जास्त कोरोना बाधित भागात चौथ्या क्रमांकावर आहे. याशिवाय बच्चन कुटुंबात काम करणाऱ्या 54 सदस्यांची यादी बीएमसीने काढली असून त्यांची कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. यापैकी 28 सदस्यांचे नमुने घेण्यात आले असून त्यांचे अहवाल सोमवारी येण्याची शक्यता आहे.

दरम्यान शनिवारी अमिताभ यांना श्वास घेण्यात त्रास झाला, तर अभिषेकला हलका ताप आला, त्यानंतर दोघांची चाचणी घेण्यात आली आणि दोघेही जण कोरोना पॉझिटिव्ह आले, त्यानंतर दोन्ही अभिनेत्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचवेळी ऐश्वर्या आणि आराध्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती आणि दोघेही एसिम्प्टोमॅटिक आहेत. एक दिवस आधी रॅपिड चाचणीत ऐश्वर्या, आराध्या आणि जया बच्चन यांची कोरोना टेस्ट नकारात्मक असल्याचे दिसून आले होते, परंतु त्यानंतर दुसऱ्या चाचणीत ऐश्वर्या आणि आराध्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. त्याचवेळी अमिताभ बच्चन यांची पत्नी जया आणि त्याच्या कुटुंबाशी संबंधित इतर लोक कोरोना नकारात्मक आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like