‘अँटिलीया’ प्रकरणाचे तिहार कनेक्शन, ‘जैश-उल-हिंद’ने दिली होती तुरूंगातून धमकी; सुरक्षा यंत्रणांनी ट्रॅक केला नंबर

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईस्थित अँटिल्याच्या बाहेर पार्क केलेल्या स्कॉर्पिओमधून जिलेटिन जप्त झाल्याच्या प्रकरणात नवीन खुलासे झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची तार दिल्लीच्या तिहार तुरूंगाशी जोडली जात आहेत. जैश-उल-हिंदने ज्या टेलीग्राम चॅनलवरून धमकी दिली होती, त्याची सूत्रे तिहार तुरूंगात हलविण्यात आली होती. सुरक्षा यंत्रणांनी त्या नंबरचा मागोवा घेतला आहे. आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दरम्यान, स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयित मृत्यूच्या प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाजे यांचे नाव पुढे आले आहे. मनसुखच्या कुटुंबीयांनी सचिन वाजेवर हत्येचा आरोप केला आहे. विरोधकांच्या दबावात येत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले की सचिन वाजे यांची गुन्हे शाखेतून बदली झाली आहे. पोलिस अधिकारी सचिन वाजे यांच्यावरील विरोधी हल्ले थांबत नाहीत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी असा दावा केला की, मनसुख हिरेनची हत्या खुप योजना आखून केली गेली होती आणि या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी व्हावी अशी महाराष्ट्र सरकारची इच्छा नाही.

दरम्यान, 5 मार्च रोजी मनसुख हिरेनचा मृतदेह ठाणे खाडीत सापडला. बुधवारी मनसुख हिरेनची पत्नी आणि त्याचा मुलगा एटीएस ठाणे युनिटमध्ये निवेदन नोंदवण्यासाठी आले आणि तेथे सुमारे पाच तास थांबले. बुधवारी मनसुखच्या मृत्यूप्रकरणी एटीएसने सचिन वाजे यांचे निवेदनही नोंदवले. वाजे यांनी आपल्या निवेदनात मनसुख स्कॉर्पियो आपल्याकडे ठेवण्याचा आरोप नाकारला. त्याच स्कॉर्पिओमध्ये अँटिलियासमोर, जिलेटिनच्या कांड्या सापडल्या.

विरोधकांच्या हल्ल्याला मुख्यमंत्र्यांनी दिले प्रत्युत्तर
महाराष्ट्र एटीएस मनसुखच्या मृत्यूचा तपास करीत आहे. मनसुखच्या पत्नीने एफआयआरमध्ये सचिन वाजेवर मनसुखचा खून केल्यााचा आरोप केला आहे. फडणवीस यांनी सरकारवर वाजे यांना वाचविल्याचा आरोप केला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या आरोपाला प्रत्युत्तर देत मोहन डालेकर आत्महत्येसाठी भाजपला घेराव घालण्याचा प्रयत्न केला.

सचिन वाजे वादग्रस्त पोलिस अधिकारी
सचिन वाजे हे वादग्रस्त पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जातात. सचिन वाजे यांनी आपल्या 30 वर्षांच्या कारकीर्दीत 63 गुन्हेगारांंचा एनकाउंटर केला. कुख्यात गुंड मुन्ना नेपाळीचा सचिन वाजेने एनकाउंटर केला. 2 डिसेंबर 2002 रोजी घाटकोपर, मुंबई येथे एका बसवर बॉम्ब स्फोट झाला होता, ज्यात दोन लोक ठार झाले, तर 39 लोक जखमी झाले, पोलिसांनी या प्रकरणात आठ जणांना अटक केली, त्यातील एक आरोपी ख्वाजा युनूस, पोलिस कोठडीत असताना मरण पावला. या प्रकरणात सचिन वाजे व इतर तीन पोलिस कर्मचा्यांवर खुनाचा आणि पुरावा लपवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2004 मध्ये सचिन वाजे यांना अन्य पोलिसांसह निलंबित करण्यात आले होते. 2007 मध्ये सचिन वाजे यांनी पोलिसांच्या नोकरीतून राजीनामा दिला होता. मात्र, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही.

2008 मध्ये सचिन वाजे दसऱ्याच्या मेळाव्यात शिवसेनेत रुजू झाले, पण ते पक्षात फारसे सक्रिय दिसत नव्हते, 16 वर्षे पोलिस नोकरीपासून दूर असलेले सचिन वाजे पुन्हा 9 जून 2020 रोजी नोकरीवर परतले, त्यांना गुन्हे शाखेत महत्त्वपूर्ण पोस्टिंग देण्यात आली होती.