लग्नाच्या आमिषाने महिला पोलिस अधिकार्‍यावर बलात्कार, मुंबईतील घटना

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – लग्नाचे अमिष दाखवून एका सहायक पोलीस निरीक्षकाने महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. या प्रकरणी पीडितेने तक्रार दिल्यानंतर डोंगरी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा दक्षिण मुंबईतील एका पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, पिडितेने याबाबत मुंबईतील डोंगरी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार डोंगरी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने लग्नाच्या भूलथापा देऊन अनेकदा बलात्कार केला. लग्नासंबंधी विचारले असता आरोपीने स्पष्ट शब्दांत नकार दिल्याचे पिडितेने म्हटले आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या कुटुंबातील दोघाविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुुरु केला आहे.