अभिनेता अरमान जैन पोहचला ईडी कार्यालयात; मनी लॉड्रिंग प्रकरणात बजावले होते समन्स

मुंबई : आमदार प्रताप सरनाईक व त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांच्या चौकशी दरम्यान नाव आल्याने मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने राजकपूर यांचे नातू अरमान जैन आज सकाळी सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला आहे. टॉप ग्रुप प्रकरणात चौकशी करण्यासाठी अरमान जैन याला ६ दिवसांपूर्वी ईडीने समन्स बजावले होते.

अरमान जैन हा अभिनेता राज कपूर यांचा नातू आणि रीमा जैन यांचा मुलगा आहे. रणबीर कपूर, करिना कपूर यांचा चुलत भाऊ असून लेकर हम दिवाना दिल या चित्रपटात तो दिसला आहे. स्टुडंट ऑफ दी इयर, एक मै और एक तू आणि माय नेम इज खान यासारख्या चित्रपटांना त्याने सहाय्य केले आहे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग याचा तो जवळचा मित्र आहे. या प्रकरणात विहंग सरनाईक यांची दोनदा चौकशी करण्यात आली आहे. त्यातून मनी लॉड्रिंगच्या प्रकरणात जैन याचे नाव पुढे आले आहे.