मुंबई ATS चा पुरंदर तालुक्यातील दिवे येथील कंपनीवर छापा, 5 कोटीचे ड्रग जप्त

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) : पुरंदर तालुक्यातील दिवे (ता.पुरंदर ) येथे मुंबई एटीएसच्या पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल ८० कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून याबाबतीत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दि.६ डिसेंबर २०१९ रोजी दहशतवाद विरोधी पथक ( एटीएस) मुंबई (जुहु) यांनी अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या महेंद्र परशुराम पाटील(वय ४९ वर्षे) आणि संतोष बाळासाहेब आडके (वय२९ वर्षे) या दोन आरोपींना अटक केली होती.

एटीएसने या आरोपींकडुन ५ कोटी, ६० लाख, ६० हजार रूपये किमतीची १४ किलो ३००ग्रँम मेफेड्रोन पावडर (एमडी) मुंबईतील विलेपार्ले व पुंरंदर येथील सासवड येथुन जप्त करण्यात आली या गुन्ह्यात या दोन्ही आरोपींना अंमली पदार्थ तस्करी व वाहतुक कायद्यान्वये न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मुंबई दहशतवादी विरोधी पथकाच्या जुहु युनिटचे पोलीस निरीक्षक दया नायक, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कुंगीर यांनी या गुन्ह्यातील आरोपींची कसुन चौकशी केल्यानंतर आरोपी संतोष बाळासाहेब आडके याने कबुली दिली की तो मेफेड्रोन पावडर (एमडी) या बंदी असलेल्या अंमली पावडर तयार करीत होता.यासाठी त्याने पुरंदर तालुक्यातील सासवड जवळील दिवे गावातील एक गोडाऊन भाड्याने घेतले होते.

याठिकाणी आरोपींनी श्री आल्फा केमिकल्स नावाची केमिकल कंपनी चालु केली होती.आरोपींकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे दि.१९ फेब्रुवारी २०२० रोजी मुंबई दहशतवादी विरोधी पथकाच्या जुहु युनिट ने दिवे (ता.पुरंदर) येथील श्री केमिकल्स या कंपनीवर धाड टाकली यावेळी पथकाने या कंपनीत ४ कोटी २० लाख रूपये किमतीचे १० किलो ५०० ग्रँम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज आणि कच्चे केमिकल, तसेच १ कोटी २० लाख किमतीचे एमडी बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले तज्ञांच्या माहिती नुसार या मेफेड्रोन (एमडी) बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्चा मालापासून तब्बल २०० किलो एम डी बनवण्यात येणार होते.याची जागतीक बाजारातील तब्बल किमंत ८० कोटी रुपये आहे.

दिवे (ता.पुरंदर) येथील सदर गोडाऊनमध्ये अशाप्रकारे अंमली पदार्थांची तस्करी करून अंमली पदार्थ व ड्रग्ज तयार केले जात आहे. याचा कोणी विचार देखील केला नसेल सदर गोडाऊनला कोणत्याही प्रकारचा कंपनीचा बोर्ड लावलेला नसून अत्यंत जुने झालेले शटर असून हे शटर कधी उघडले गेले की नाही असा प्रश्न पडावा असे स्थिती सध्या या गोडाऊनची आहे. या गोडाऊन भोवती तारेचे भक्कम कुंपण केले असल्याने या गोडाऊन क्षकडे सहजरीत्या कोणाला जाता येणे शक्य नाही.

गोडाऊन शेजारी निवासी घरेआहेत तरीदेखील दिवे गावात कोणाला संशय येणार नाही अशा पद्धतीने हे काम अनेक वर्षांपासून चालत असल्याचे आढळून येत आहे. आरोपीच्या कंपनीला कागदोपत्री नाव श्री केमिकल्स नाव दिलेलं असलं तरी याठिकाणी कोणत्याही कंपनीचा बोर्ड लावलेला नाही.एकंदरीतच मुंबई दहशतवादी पथकाच्या या धडक कारवाईमुळे पुरंदर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

संपूर्ण पुरंदर तालुक्यात अशा पद्धतीचे निनावी कोणत्याही प्रकारचे बोर्ड नसलेले अनेक मोठमोठे गोडाऊन माळरानावर, डोंगर रांगांच्या शेजारी उभे केलेले आहे या मोठ्या गोडाऊनला कोणत्याही प्रकारचे बोर्ड लावलेले नाहीत. शिवाय या गोडाऊनमध्ये नेमकं काय ठेवण्यात आले आहे हे देखील समजून येत नाही. त्यामुळे अशा पद्धतीच्या गोडाऊनची वारंवार तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.