सकल मराठा समाजाचा मुंबई बंद स्थगित

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन

मराठा समजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरु आहे. आज मुंबई बंदची हाक दिली होती. या आंदोलनाना हिंसक वळण लागल्याने पोलिसांना आंदोलकांवर हवेत गोळीबार करावा लागला होता. सकल मराठा समाजाने आज पत्रकार परिषद घेऊन हा बंद स्थगित केला असल्याचे जाहीर केले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई बंद स्थगित केल्याची मराठा क्रांती सकल मोर्चाची घोषणा राजकीय हेतूने हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप सकल मराठा समन्वयांकडून करण्यात आला आहे. आंदोलकांना शांतता राखण्याच आवाहन सन्मवयकांकडून कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B077N6C4VZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’12c90e4e-8fec-11e8-be63-4b4fcc178de0′]

मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने काल 24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. त्यानंतर आज म्हणजे मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे. दादरमधील राजर्षी शाहू सभागृहात काल मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड बंदची हाक देण्यात आली आहे. आजच्या बंदमध्ये कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, तोडफोड होणार नाही, असं आश्वासन आयोजकांनी दिलं आहे.बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.