Mumbai Bank Election 2022 | मुंबै बँक निवडणुकीत भाजपला दणका ! अध्यक्षपद शिवसेना-राष्ट्रवादीकडे तर उपाध्यक्षपद भाजपकडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Bank Election 2022 | मुंबई बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणकीमध्ये (Mumbai Bank Election 2022) राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेची (Shiv Sena) युती पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी याबाबत घोषणा केली. त्यामुळे मुंबै बँक निवडणुकीत अखेर शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपली विजयाची कमान रोवली आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे (Siddharth Kamble) यांची निवड करण्यात आली आहे. मात्र उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत युतीचा पराभव झाला आहे. समसमान मत पडल्यामुळे ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली, यात भाजपचे उमेदवार विठ्ठल भोसले (Vitthal Bhosle) यांची निवड झाली आहे. यामुळे एक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं.

 

दरम्यान या निवडणुकीमध्ये भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांना धक्का बसला आहे. दरेकर यांचा पराभव झाला आहे. दरम्यान, अध्यक्षपद गेले असले तरी उपाध्यक्षपदी भाजपने (BJP) बाजी मारलीय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे 11 संचालक सदस्य संख्या झालीय. तसेच भाजपकडे 9 संचालक संख्या होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पारड्यात अधिक मत मिळाली. पण, उपाध्यपदाच्या निवडणुकीत समसमान मतं मिळाल्यामुळे गोंधळ झाला. त्यामुळे महाविकास आघाडीला उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. (Mumbai Bank Election 2022)

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या सूचनेनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई बँकेतील प्रतिनिधीची एकत्र बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही (Milind Narvekar) उपस्थित होते. यावेळी युतीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर मतदान प्रक्रिया पार पडली.

 

Web Title :-  Mumbai Bank Election 2022 | mumbai bank election shiv sena ncp wins presidential election defeats praveen darekar mumbai bank election news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा