भाजपच्या ‘या’ उमेदवाराकडे 441 कोटींची संपत्ती, मुंबईत 5 ‘अलिशान’ फ्लॅटसह एक ‘जग्वार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई भाजपचे अध्यक्ष असलेल्या मंगल प्रभात लोढा यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात 441 कोटींपेक्षा अधिक संपत्ती घोषित केली आहे. मलबार हील येथून ते विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

मुंबईतील सर्वात पॉश आणि उच्चभ्रू असलेल्या मलबार हिल येथून सलग पाच वेळा निवडून आलेले आमदार लोढा हे पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे आणि पत्नीकडे मिळून 252 कोटींची स्थावर मालमत्ता तसेच 189 कोटींची जंगम मालमत्ता असल्याचे म्हंटले आहे.

रियल इस्टेटमध्ये लोढा परिवार –
आमदार असलेल्या लोढा यांच्याकडे एक 14 लाखांची जग्वार कार आहे तर बॉण्ड आणि शेअर्समध्ये देखील त्यांची गुंतवणूक आहे. दक्षिण मुंबईमध्ये त्यांचे पाच फ्लॅट आहेत आणि रियल इस्टेट हा त्यांचा व्यवसाय आहे. मलबार हिल मध्ये त्यांच्याकडे एक घर तसेच राजस्थानात एक प्लॉट देखील आहे.

लोढा यांच्यावर दाखल असलेल्या तक्रारी –
या व्यतिरिक्त दक्षिण मुंबईमध्ये त्यांच्या पत्नीच्या नावे एक फ्लॅट आणि काही व्यवसायिक संपत्ती देखील आहे. प्रतिज्ञापत्रानुसार लोढा यांच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप यंदाची विधानसभेची निवडणूक लढवत आहे.

Visit : Policenama.com