उध्दव ठाकरेंच्या मंत्रिमंडळ विस्तारावर भाजपचा ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘हे तर बाप-लेकाचं सरकार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज करण्यात आला. यामध्ये शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी निशाणा साधला आहे. हे पिता-पुत्राचे सरकार आहे, हे जनतेचे सरकार नसल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

मुनगंटीवार यांनी पुढे म्हटले आहे, आज जर मंत्रिमंडळ विस्तार झाला नसता तर नेत्यांमधील नाराजी वाढली असती. काही नेत्यांनी तर आपापल्या मतदारसंघामध्ये मी मंत्री होणार असल्याचे घोषीत केले होते. आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, आज शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेले नाही. लवकरच त्यांना खातेवाटप करण्यात येणार आहे.

मुनगंटीवार पुढे म्हणाले, आदित्य ठाकरे यांना मंत्री करणे योग्य नसल्याचे सांगते त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, एका मुलाने आपल्या वडिलांना दिलेले वचन पाळण्यासाठी आपला विचार विसरून गेला. हे सरकार फसवे आहे. मंत्रिमंडळ शपथ विधीला बोलावले होते का यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, आम्ही मुंबईतच होतो. त्यांनी आम्हाला कोणतेही निमंत्रण दिले नाही किंवा फोन केला नाही. तरी देखील पत्र लिहून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/