बारमध्ये युवतीसोबत नाचताना भाजप आमदाराचा व्हिडिओ ‘व्हायरल’, संबंधितांविरूध्द FIR (व्हिडिओ)

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन – गोंदियाचे भाजपचे आमदार संजय पुरम यांनी आपल्या विरोधकांच्या विरोधात त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्या कारणाने गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा एका बारमध्ये एका मुलीबरोबर नाचतानाचा कथित व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला.

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव –
देवरी मधील आमदार एका मुलीचा हात पकडून दारुच्या नशेत दारुची बॉटल घेऊन बॉलिवूड गाण्यावर नाचताना दिसत आहे. आमदाराने दावा केला की व्हिडिओमध्ये फेरफार केली आहेत आणि व्हिडिओमध्ये त्यांच्या सारख्या दिसणारा दुसरा कोणीतरी व्यक्ती आहे. ते त्या व्हिडिओमध्ये नाहीत.

निवडणूकी आधी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न –
पोलिसांनी सांगितले की गुरुवारी पुरम यांनी देवरी पोलिस ठाण्यात अज्ञात लोकांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 500 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुरम म्हणाले की पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणूकीआधी माझी प्रतिमा मलिन करण्याचा विरोधकांचा डाव आहे.

राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूका आहेत. निवडणूक आयोगाने तारखा घोषित केल्या आहेत. राज्यात 288 जागावर 21 ऑक्टोबरला मतदार पार पडेल. त्यांनतर तीन दिवसांनी 24 ऑक्टोबरला परिणाम समोर येईल.

Visit : Policenama.com