मुंबईतील भाजपच्या बैठकीत विखे पाटील पिता-पुत्राचा आज ‘फैसला’ ? निष्ठावंतांची ‘नाराजी’ कायम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या परंतु भाजपला मात्र या निवडणूकीत यश संपादन करता आलं नाही. त्यानंतर पक्षातील धूसफूस उघड झाली आणि नाराज नेत्यांची भाजपमध्ये एक फळीच बनली. त्यानंतर मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. विधानसभा निवडणूकीपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला, त्यामुळे भाजपला मोठा फायदा होईल असे मागले जात होते. असे असताना माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव झाल्याने यांच्यासह अनेकांचा पराभव झाल्यामुळे विखे पाटलांच्या विरोधात पक्षातून नाराजी उफळली. त्यामुळे आजची बैठक महत्वाची असणार आहे.

अहमदनगर जिल्हा निवडणूक आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील भाजप नेते भाजप प्रदेश कार्यालयात पोहोचले आहेत. या बैठकीला सुजय विखे पाटील. राधाकृष्ण विखे पाटील, शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे इत्यादी नेते बैठकीत उपस्थित आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नगरमध्ये पक्षाविरोधी काम केल्याचा ठपका आहे. राम शिंदेंसह अनेक भाजप नेत्यांनी विखेंविरुद्ध तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे विखे पिता-पुत्रावर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

राम शिंदे काय म्हणाले –

राम शिंदे यांंनी सांगितले की आजच्या बैठकीत आम्ही आमच्या व्यथा मांडणार आहोत. निवडणूकीपूर्वी, दरम्यान आणि नंतर काय झाले हे आम्ही पक्षाला कळवले आहे. त्यामुळे आता आम्हाला कारवाईची अपेक्षा आहे.

या बैठकीत निवडणूकीचा आढावा तसेच आगमी काळातील आंदोलनं, संघटनात्मक काम या सर्व मुद्यांवर बैठकीत चर्चा होईल.

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्यावरुन शुक्रवारी पुन्हा एकदा मुंबईत वातवरण तापणार असून कायद्याच्या बाजूने आणि विरोधात आंदोलन होणार आहेत. भाजप देखील कायद्याच्या समर्थनार्थ संविधान सन्मान मोर्चाचे दुपारी 4 वाजता ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत. मोर्चाचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत. नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

तसेच आझाद मैदानात या कायद्याला विरोध करण्यासाठी जॉईंट  अ‍ॅक्शन कमिटी फॉर सोशन जस्टिस तर्फे आंदोलन केले जाणार आहे. यात जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद, माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील, अभिनेत्री स्वरा भास्कर सहभागी होणार आहेत. दुपारी  या मोर्चाला सुरुवात होईल.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/