डान्स बारवर पोलिसांचा छापा ; बार गर्लसोबत नाचणाऱ्या BMC अधिकाऱ्यासह १५ जणांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई पोलिसांनी एका डान्सबारवर छापा टाकला असून यावेळी बारगर्लसोबत नाचणाऱ्या मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यासह एकूण १५ जणांना अटक करण्यात आली आहे.

दक्षिण मुंबईलतील एका डान्सबारवर मुंबई पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी तेथे बारगर्लसोबत नाचणाऱ्या बीएमसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यासह हॉटेल मॅनेजमेंटमधील ९ जणांसह इतर सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या सर्वांना न्यायालयात हजर केल्यावर त्यांना जामीनावर सोडून देण्यात आलं आहे.

राज्यातील डान्सबारवर राष्ट्रवादीचे नेते आणि दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी २००५ साली बंदी घातली होती. त्यानंतर काही दिवसांपुर्वी डान्सबार संदर्भातील जाचक अटी आणि नियमांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर यासाठी काही अटी ठेवून डान्सबार सुरु करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली होती.