‘बॉलिवूड हब’ म्हणून ओळखली जाते मुंबईची ‘ही’ बिल्डिंग ! ‘इथं’ 16 पेक्षा जास्त सेलिब्रिटींची घरं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   ओबेरॉय स्प्रिंग्स मुंबईचं पॉश अपार्टमेंट म्हणून ओळखलं जातं. काही दिवसांपूर्वीच ओबेरॉय स्प्रिंग्स खूप चर्चेत आलं होतं जेव्हा 11 वर्षीय एक मुलगी कोरोना पॉझिटीव आढळल्यानंतर ही पूर्ण बिल्डिंग सील करण्यात आली होती. यानंतर अनेक फेमस स्टार्स आपापल्या घरात कैद झाले होते.

खास बात अशी की, ओबेरॉय स्प्रिंग्स बॉलिवूड हब म्हणूनही ओळखलं जातं जे मुंबईच्या अंधेरी वेस्टमध्ये न्यू लिंक रोडवर स्थित एक हाय क्लास रेजिडेंट सोसायटी कॉम्प्लेक्स आहे. यात 1 किंवा 2 नाही तर तब्बल 16 सुप्रसिद्ध टीव्ही आणि बॉलिवूड स्टार्सची घरे आहेत.

https://twitter.com/30Kumaar/status/1265612400767700992?s=20

ओबेरॉय स्प्रिंग्समध्ये विकी कौशल, चित्रांगदा सिंह, राजकुमार राव, पत्रलेखा, कृष्णा अभिषेक-काश्मीरा शाह, डायरेक्टर आनंद एल राय, प्रभू देवा, अहमद खान, राहल देव-मुग्धा गोडसे सहित अनेक सेलिब्रिटी राहतात.

ओबेरॉय स्प्रिंग्स तीन विंग्समध्ये विभागलं आहे. प्रत्येक बिल्डींग ही 35 फ्लोरची आहे. ज्याची किंमत 4.50 कोटी ते 15 कोटी आहे.

ओबेरॉय स्प्रिंग्समध्ये स्विमिंग पूल, हेल्थ क्लब, जॉगिंग ट्रॅक, पोडियम पार्किंग, एरोबिक सेंटर, योाग रूम, जकूजी अशा अनेक सुविधा आहेत. मुलांसाठी इनडोर आउटडोर प्ले एरिया देखील आहे. ही सोसायटी जिहूच्या खूप जवळ आहे.