लयभारी ! Google ची नोकरी सोडून महाराष्ट्रातील ‘या’ पठ्ठयानं सुरू केलं स्वत:चं किचन ! आता कमावतोय 50 लाख

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आजकाल अनेकजण गुगल,फेसबुक अशा कंपन्यांध्ये नोकरी करण्याचं स्वप्न पहात असतात. परंतु एक असा तरूण आहे ज्यानं चक्क गुगलच्या नोकरीला रामराम ठोकला अन् स्वत:चं किचन सुरू केलं. आज तो प्रचंड पैसाही कमावत आहे. या तरूणाचं नाव मुनाफ कपाडिया आहे.

अन् त्यानं सोडली गुगलची नोकरी

बोहरी समाजाच्या मुनाफला वाटलं की, या समाजातील जेवणाची चव सर्वांपर्यंत पोहोचायला हवी. या जेवणााचा आनंद इतरांना घेता यावा. हाच विचार करून मुनाफनं आईची मदत घेऊन स्वत:चं किचन सुरू केलं. ग्राहकांनाही त्याच्या जेवणाची चव आवडली. याच व्यवसायाच्या जोरावर मसुरी, हैदराबाद आणि नंतर मुंबईत आलेल्या मुनाफनं आपली गुगलमधील नोकरी सोडली. गुगलमध्ये तो अकाऊंट स्ट्रॅटजिस्ट म्हणून काम पहात होता.

फोर्ब्स मासिकातून त्याला आला फोन

जेव्हा मुनाफनं व्यवसायाची सुरुवात केली तेव्हा त्याला मनाप्रमाणे ऑर्डर्स मिळत नव्हत्या. एक वेळ अशीही आली होती की, त्याला हा व्यवसाय बंद करावा असंही वाटलं. मात्र अचानक एकदा त्याला फोर्ब्स मासिकातून कॉल आला. त्यांनी सांगितली की, त्याची ही सक्सेस स्टोरी त्यांच्या मासिकात छापली जाणार आहे. यानंतर मुनाफचा कॉन्फिन्स आणखी वाढला. यानंतर त्यानं या व्यवसायात स्वत:ला झोकून दिलं.

बॉलिवूड कलाकारांनीही घेतली मुनाफच्या थाळीची टेस्ट

मुनाफच्या किचमधील थाळी बॉलिवूड कलाकारांनीही चाखली आहे. यात ऋषी कपूर, हृतिक रोशन आणि राणी मुखर्जी अशा प्रसिद्ध कलाकारांचा समावेश आहे.

सध्या तो कमावतो 50 लाख

सध्या मुनाफ त्याच्या या व्यवसायातून वर्षाला तब्बल 50 लाखांची कमाई करत आहे.