अभिमानास्पद ! झोपडपट्टीत राहणाऱ्या ‘त्या’ चिमुकल्याचा न्यूयाॅर्कमधील ‘फिल्म फेस्टिवल’मध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईमधील कलिना झोपडपट्टीत राहणारा अकरा वर्षाचा मुलगा सनी पवार याला ‘न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल’ मध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरविण्यात आले आहे. सनीला ‘चिप्पा’ हॉलिवूड चित्रपटातील भूमिकेसाठी सनीला पुरस्कार मिळाला आहे.

सनी पवार हा मुंबईतूल कलिना परिसरातील कुर्वे नगर झोपडपट्टीत राहतो. त्याचे वडील मुंबईत महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करतात. दिग्दर्शक गार्थ डेव्हिस यांच्या २०१६ मधील ‘लायन’ या हॉलिवूडपटातही काम केले आहे. या चित्रपटात सनीने देव पटेलच्या बालपणाची भूमिका साकारली आहे. सनी अतिशय गुणी कलाकार आहे. चिप्पा या चित्रपटातील भुमिकेसाठी त्याला पुरस्कार मिळाला आहे. ‘चिप्पा’ या चित्रपटात रस्त्यावर राहणाऱ्या एका लहान मुलाच्या इच्छा-आकांक्षाची कथेवर आहे. कोलकत्याच्या रस्त्यावर राहणाऱ्या लहान मुलाची रंजक गोष्ट या चित्रपटात आहे.

सनी म्हणाला की, ‘मला माझ्या आई-वडीलांना आलियान घर घ्यायचे आहे. माझे सिनेसृष्टीत जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी खुप कष्ट घेतले. त्यांनी स्वप्न पुर्ण करायची आहे. त्यातबरोबर सर्वेात्कृष्ट बालकलाकार पुरस्कार मिळाल्याने मी खूप खुश आहे. याचे सर्व श्रेय माझ्या पालकांना आहे. मला रजनीकांत यांच्यासारखे मोठे व्हायचे आहे. माझ्या पालकांना माझा अभिमान वाटेल असे काम करायचे आहे. माझी बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्हीमध्ये काम करण्याची इच्छा आहे. ‘

सनीला एएसीटीए पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट अभिनेता, आशिया-पॅसिफिक स्क्रिन पुरस्कारांतर्गत विशेष नामोल्लेख ग्रॅण्ड ज्युरी पुरस्कार आणि बालकलाकार पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ‘लायन’ सिनेमातील सनीला समीक्षक निवड (स्पेशल ज्युरी अवाॅर्ड) पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट बालकलाकार श्रेणीतही नामांकन मिळाले होते.