धक्‍कादायक ! लोकल थांबवून मोटरमनने लघुशंका केल्याच्या व्हिडीओने प्रचंड खळबळ (व्हिडीओ)

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये एक मोटरमन लघुशंका करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ मुंबईतील असून उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकांदरम्यान घडलेल्या घटनेच्या या व्हडिओत मध्य रेल्वेचा मोटरमन दिसून येत आहे. मात्र आता यावर मोठे वादंग निर्माण झाल्यानंतर या प्रकरणावर मध्य रेल्वेने खुलासा केला आहे.

उल्हासनगर रेल्वे स्थानकातून हि रेल्वे रवाना झाल्यानंतर या मोटरमनने श्रीराम चौकाच्या उड्डाणपुलाजवळ रेल्वे थांबवत लघुशंकेसाठी खाली उतरला. त्याने अगदी आरामात आपले काम उरकले आणि पुन्हा लोकलमध्ये जाऊन ती पुढे घेऊन गेला. रेल्वेतील प्रवाशांनी देखील या घटनेची काहीही तक्रार दाखल केली नाही किंवा नाराजी देखील व्यक्त केली नाही. त्यामुळे हे प्रकरण इतके मोठे होण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र तेथील एका स्थानिक पत्रकाराने या घटनेचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर या घटनेची लोकांना माहिती मिळाली. यानंतर नागरिकांनी मोठया प्रमाणावर टीका करत या मोटरमनला चांगलेच धडे दिले आहेत. काही जण या कृत्यामुळे मोटरमनला शिव्या घालत आहेत तर काहीजण त्याच्या बाजूने बोलताना दिसून येत आहेत.

दरम्यान, याविषयी मध्य रेल्वेने हि नैसर्गिक गोष्ट असल्याने यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी यावर बोलताना म्हटले कि, मोटरमन हा देखील एक माणूस असून माणुसकीच्या नजरेतून या घटनेला पाहावे.

 घोरण्याच्या समस्येवर ‘या’ ६ घरगुती उपायांनी ‘कंट्रोल’ करा

बकरीच्या दुधाचे ‘हे’ आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे, जाणून घ्या

नेहमीच आद्रक चहा पिणे योग्य नाही ; होऊ शकतो ‘हा’ त्रास

 ‘सीसी क्रीम’ म्हणजे काय ? याचा वापर केल्यामुळे होतात फायदे आणि नुकसान

 ‘हे’ फळं खा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा

 कच्ची पपई खाल्याने होतात ‘हे’ ३ फायदे, जाणून घ्या

Loading...
You might also like