पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Championship League T-20 | कोकण युवा प्रतिष्ठान तर्फे ‘मुंबई चम्पीयनशीप लीग’ ट्वेन्टी-२० अजिंक्यपद जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यासाठीची आयोजित ही स्पर्धा फेब्रुवारी २०२३ या महिन्यात होणार आहे. स्पर्धेत एकूण ६ लाख रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहे. (Mumbai Championship League T-20)
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक धनंजय चाळके यांनी सांगितले की, मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे या चार जिल्ह्यांमधील क्रिकेट संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या जिल्हास्तरीय स्पर्धेत एकूण ४८ संघ सहभागी होणार आहेत. मुंबईमधील २४ संघ, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामधून प्रत्येकी ८ संघ आणि पुणे जिल्ह्यातून १२ संघ सहभागी होणार आहेत. (Mumbai Championship League T-20)
नवीन वर्षामध्ये पुण्यातील संघांसाठी या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. पुण्यातून १२ संघ या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचा आयोजकांचा मानस आहे.
गटसाखळी फेरी, बाद फेरी आणि अंतिम अशा पद्धतीने या स्पर्धेचे सामने होणार आहेत. मुंबई, पुणे, ठाणे आणि रायगड या चारही जिल्ह्यातील एकूण २४ संघ बाद फेरीमध्ये खेळणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघाला २ लाख ५० हजार रूपये आणि करंडक तर,
उपविजेत्या संघाला करंडक आणि १ लाख ५० हजार रूपये मिळणार आहे.
तिसरा क्रमांक मिळवणार्या संघाला ७५ हजार रूपये आणि करंडक तर,
चौथा क्रमांक मिळवणार्या संघाला ५० हजार रूपये आणि करंडक देण्यात येणार आहे.
याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी १० हजार रूपये देण्यात येणार आहे.
याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू याला १५ हजार रूपये पारितोषिक देण्यात येणार आहेत.
तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर पारितोषिकही देण्यात आहेत.
Web Title :- Mumbai Championship League T-20 | Organization of ‘Mumbai Championship League’ Twenty-20 Championship District Level Cricket Tournament !
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update