विधानसभा निवडणूक आणि जागावाटपावर चंद्रकांत पाटील म्हणतात…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात विधानसभेचे वारे जोरात वाहू लागले आहे. पुढील महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक पार पडत असून सर्वच पक्षांनी जागावाटपासंदर्भात बैठकांचा धडाका लावला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या निवडणुकीत आघाडी घेतली असून यामध्ये काँग्रेसने आपली उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता सत्ताधारी पक्षाचे जागावाटप कधी संपते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर राज्यात आचारसंहिता कधी लागणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. आचारसंहितेवर भाष्य करताना ते म्हणाले कि, राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी तयार राहावे. काल मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या निवडणूक समितीची बैठक पार पडली. त्याचबरोबर कोणत्या मतदारसंघात आपली ताकद आहे, याचादेखील या बैठकीत आढावा घेतला गेला. तब्बल सात तास हि बैठक चालली होती. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केले आहे. त्याचबरोबर जागावाटपावर देखील त्यांनी भाष्य केले. यावेळी ते म्हणाले कि, जागावाटप अंतिम टप्यात आले असून पाच ते सहा दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्याचबरोबर काही जागांची अदलाबदली देखील केली जाणार आहे.

दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत भाजप 154 ते 159 जागा लढविणार तर शिवसेना 120 जागा लढविणार असल्ल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मित्रपक्षांना प्रत्येकी 9 जागा देणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता शिवसेना हा फॉर्म्युला स्वीकारणार कि नाही हे पाहणे फार महत्वाचे आहे.

आरोग्यविषयक वृत्त –