Mumbai CNG-PNG Price | CNG आणि PNG च्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai CNG-PNG Price | देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा (Petrol-diesel price hike) भडका उडाला असताना आता त्यात आणखी भर पडली आहे. केंद्र सरकारने (Central Government) उत्पादीत नैसर्गिक वायू अर्थात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात (Mumbai CNG-PNG Price) मोठी वाढ केली आहे. महानगर गॅसकडून (Mahanagar Gas Limited) ही दरवाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.26) मध्य रात्रीपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. सीएनजी प्रतिकिलो 3.06 रुपये तर पीएनजीच्या दरांत 2.26 रुपयांनी वाढ झाली आहे.

 

मुंबई आणि आसपासच्या भागात पाईपद्वारे गॅसपुरवठा करणाऱ्या कंपनीने नैसर्गिक गॅस (CNG) प्रतिकिलो 3.06 रुपयांनी वाढवला आहे. तर PNG चे दर 2.26 रुपये प्रति किलो वाढवण्यात आले आहे. त्यानुसार CNG च्या सर्व करासहित सुधारीत किंमत 61.50 प्रती किलो आणि पीएनजी गॅस 36.50 रुपये घनमीटर (स्लॅब) झाले आहेत. हे दर शुक्रवारी (दि.26) मध्यरात्री लागू होणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. (Mumbai CNG-PNG Price)

कंपनीने सांगितले की, सीएनजी आणि देशांतर्गत पीएनजीची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी एमजीएल (MGL) अतिरिक्त बाजारातील नैसर्गिक वायू खरेदी करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे एमजीएलच्या गॅसच्या किमतीतही वाढ झाली आहे. गॅस खर्चातील वाढ भरुन काढण्यासाठी कंपनीने सीएनजी आणि पीएनजीच्या मूळ किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहेत. ही दरवाढ मुंबई आणि आसपासच्या परिसरात आज मध्यरात्री पासून लागू होणार आहे.

 

Web Title :- Mumbai CNG-PNG Price | CNG and PNG prices rise again in mumbai, find out the rates

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sanjay Raut | संजय राऊतांचं मोठं भाकित, म्हणाले – ‘2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 48 पैकी 45 जागा जिंकेल’

Shreyas Iyer | सुनिल गावसकरांकडून कॅप घेणार्‍या श्रेयसनं पदार्पणाच्या कसोटीत केली त्यांच्या मेव्हण्याची बरोबरी, जाणून घ्या नेमकं काय केलं

Pune Cyber Crime | सोशल मिडियावर गाद्या विकणे आले अंगाशी ! महिलेला सायबर चोरट्यांनी घातला साडेपाच लाखांना गंडा

Pune Crime | अनाधिकृत बांधकामावरील कारवाईला विरोध करुन पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न; पुण्याच्या भारती विद्यापीठ परिसरातील घटना

Pune Crime | कस्टम अधिकारी असल्याची बतावणी करुन स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली 84 लाखांना गंडा; पुण्याच्या शिवाजीनगर गावठाणातील घटना

Bhediya Poster | वरूण धवनच्या आगामी चित्रपट ‘भेडिया’चं पोस्टर आऊट, वरूण दिसणार ‘त्या’ भूमिकेत